Marathi News> मनोरंजन
Advertisement

पलक तिवारीचा ट्रेडिशनल लुक, VIDEO पाहून चाहते थक्क

 ट्रेडिशनल लुकमध्ये इतकी क्युट दिसतेय पलक तिवारी, VIDEO पाहिलात का? 

पलक तिवारीचा ट्रेडिशनल लुक, VIDEO पाहून चाहते थक्क

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी बिजली बिजली फेम पलक तिवारी (Palak Tiwari) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असेत. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच एक फोटो आणि व्हिडिओ तिचा समोर आला आहे. या व्हिडिओत ती ट्रेडिशनल लुकमध्ये दिसत आहे. तिच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

बिजली बिजली फेम पलक तिवारीने (Palak Tiwari) नुकताच एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केला आहे. या फोटोशुटमध्ये ती ट्रेडीशनल लुकमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकची सोशल मीडियावर खुपच चर्चा रंगली आहे.पलक तिवारीचे हा फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

लुकची एकचं चर्चा 
पलक तिवारी (Palak Tiwari) पारंपारिक सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह गुलाबी आणि सोनेरी सिल्क साडीमध्ये दिसते. यावेळी कॅमेऱ्यासाठी पोझ देताना ती हसत आहे आणि तिच्या पोनीटेलसह खेळत आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आई श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) लिहिले, “अरे देवा! माय बेबी.” यासोबत तिने अनेक हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवरील एका पापाराझी अकाउंटने फोटोशूटमधील पलकचा लुक शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

दरम्यान पलक (Palak Tiwari)  ही एक लोकप्रिय स्टार किड असून ती लवकरच सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Read More