Panchayat Season 4: 'पंचायत'चे आतापर्यंतचे 3 सीझन सुपरहिट ठरले आहेत. यानंतर लोक या शोच्या चौथ्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अशातच या शोचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मंजू देवी आणि क्रांती देवी निवडणुकीत समोरासमोर उभ्या आहेत. या दरम्यान, शोच्या स्ट्रीम डेटबाबत टीमने असा ट्विस्ट आणला आहे की तो जाणून तुम्हाला देखील खूप आनंद होईल.
या व्हिडीओ असे दाखवण्यात आले आहे की, रिंकी सांगतेय की आमच्या पक्षाचे एक राष्ट्रगीत असावे. त्यानंतर चंदन हातात लौकी धरलेला दिसत आहे. त्यानंतर तो असे गाणे गातो की ते ऐकल्यानंतर मंजू देवी आणि प्रधानजी नाचू लागतात. यानंतर, बिनोद ही बातमी क्रांती देवींना देतो. त्यानंतर, क्रांती देवींचे निवडणूक कर्मचारी असे गाणे बनवतात की ते ऐकल्यानंतर तुम्हाला देखील हसू अवरणार नाही.
'पंचायत सीझन 4' मध्ये मोठा ट्विस्ट
यानंतर मंदू देवी आणि क्रांती देवी समोरासमोर येतात. त्यानंतर सचिव पुढे येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला एक संधी देत आहोत. जरी हा सीझन 2 जुलै रोजी येत असला तरी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मतदान करून तो लवकर आणू शकता. मतदान करण्यासाठी panchayatvoting.com ही साइट आहे. दरम्यान, अभिनेत्याने व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, मतदानाच्या आधारे हे ठरवले जाईल की 'पंचायत सीझन 4' लवकर यायचा असेल तर तो कधी येणार.
ट्रेंडिंगमध्ये 'पंचायत' सीरीज
'पंचायत'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आम्ही नवीन सीझन आणू. तुम्ही मते आणा. आताच मतदान करा. पंचायतचा पहिला सीझन 2020 मध्ये आला होता. त्यानंतर 'सीझन 2' 2022 मध्ये आला होता आणि 'सीझन 3' 2024 मध्ये आला होता. प्रेक्षकांमध्ये या सीरिजची लोकप्रियता खूप जास्त आहे. प्राइम व्हिडीओवरील टॉप ट्रेंडिंग टीव्ही शोमध्ये 'पंचायत सीझन 3' दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. या सीझनमध्ये नीना गुप्ता यांच्यासह जितेंद्र सिंह आणि रघुवीर यादव हे देखील असणार आहेत.