Panchayat Season 4 Released : 'पंचायत सीजन 4' ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा या वेब सीरिजच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या ट्रेलर विषयी बोलायचं झालं तर 2 मिनिटं 38 सेकंदाचा हा ट्रेलर आहे. यावेळी टीम मंजू देवी आणि टीम क्रांती देवी हे एकमेकांसमोर आले आहेत. तर आता या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. या निवडणूकीच्या आधी दोन्ही पक्षात वाद झाला त्यात भांडण झालं आणि सचिव जीला मारण्यात आलं.
'पंचायत 4' चा ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं की फुलेरा गाव यावेळी युद्धाचं जणू मैदान होणार आहे. मंजू देवी आणि क्रांती देवी एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. रैलीची गाणी, मोठी वचन आणि प्रचार असं सगळं फुलेरा गावात कसं होतंय ते पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्ष हे एकमेकांना कसं हरवू शकतो यासाठी प्रयत्न करताना दिसतात. पुन्हा एकदा फुलेरा गावाची सफर करण्यासाठी तयार असणाऱ्या प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार असा प्रश्न पडला असेल तर मज्जा, मस्ती, भांडण, ह्युमर आणि ड्रामा सगळं काही पाहता येणार आहे.
आपले आवडते कलाकार एकत्र आले असले तरी त्यांच्यासोबत एक ट्विट आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. शोमध्ये पुन्हा एकदा जितेन्द्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा सारखे कलाकारा दिसणार आहेत. 'पंचायत 4' याच महिन्यात 24 जून रोजी प्राइन व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. यात ह्यूमर आणि भांडणं कशी होणार ते पाहता येणार आहे. 'पंचायत सीजन 4' मध्ये फुलेराची कहानी पुन्हा सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. 'पंचायत' ची निर्मिती 'द वायरल फीवर' (TVF) नं केलं आहे. तर या चित्रपटाला दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर चंदन कुमार यांनी या सीरिजची पटकथा लिहिली आहे. अक्षत विजयवर्गीय यांनी देखील दीपक कुमार यांना दिग्दर्शनात मदत केली आहे. तर ही सीरिज 24 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे.