Marathi News> मनोरंजन
Advertisement

Panchayat Season 4 Teaser: फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी आणि भूषण आमनेसामने; पाहा टीझर

Panchayat Season 4 Teaser : ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रतीक्षित वेब सिरीज पंचायत सीझन 4 ची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झालाय. 

Panchayat Season 4 Teaser: फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी आणि भूषण आमनेसामने; पाहा टीझर

Panchayat Season 4 Teaser : ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओची लोकप्रिय वेब सीरिज पंचायतचा मोठा चाहता वर्ग आहे. पंचायत या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन सीझन येऊ गेले आहेत. आता चाहते पुढचा म्हणजे 'पंचायत सीझन 4' ची वाट पाहत आहे. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'पंचायत सीझन 4' चा टीझर रिलीजसोबत या प्रदर्शित होणार याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. सीझन 4 चा टीझर रिलीज झाल्यानंतर तो क्षणात इंटरनेटवर व्हायरलही झाला. टीझर पाहिल्यामुळे चाहत्यांना आता सिरीजची वाट पाहणे कठीण होणार हे नक्की. 

पंचायत सीझन 4' चा टीझर प्रदर्शित

अमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकताच प्रेक्षकांसाठी पंचायत सीझन 4 चा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलं की, फुलेरामध्ये निवडणुकीचा उत्साह सुरू होणार आहे. यासोबतच दोन इमोजी देखील शेअर करण्यात आले आहेत. टीझरची सुरुवात व्हॉइस ओव्हर आणि पंचायतीतील काही दृश्यांनी होते. ज्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की तुम्ही आमच्या फुलेराची निवडणूक पाहण्यासाठी यावे. पंचायत सीझन 4 मध्ये, तुम्हाला जुन्या पात्रांना त्याच भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. या टीझरच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर पाहिला मिळतोय. 

'पंचायत सीझन 4' या दिवशी होणार प्रदर्शित!

अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या 'पंचायत' या वेब सिरीजला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निर्मात्यांनी 'पंचायत सीझन 4' प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. प्रेक्षक 2 जुलै रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'पंचायत सीझन 4' पाहू शकणार आहेत.

पंचायत वेब सिरीजच्या चौथ्या सीझनने प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करायला सुरुवात केली असून टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला पाहिला मिळतो. असो, 'पंचायत' या वेब सिरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. या शोमध्ये तुम्हाला कोणताही अ‍ॅक्शन आणि सस्पेन्स पाहायला मिळणार नाही, तरीही प्रेक्षकांना तो खूप आवडतो. पंचायत वेब सिरीजला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. त्याची कथा इतकी शक्तिशाली आहे की मालिकेतील सर्वात लहान पात्र देखील खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा जेव्हा या मालिकेचा सीझन येतो तेव्हा त्याचे मीम्स आधीच बनवले जातात. आता 'पंचायत'च्या चौथ्या सीझनला किती यश मिळेल हे पाहणे औत्सुकाचं ठरणार आहे. 

Read More