Marathi News> मनोरंजन
Advertisement

विचित्र हावभाव करत सारा म्हणाली, 'वडील सैफ आणि करीना...'; तिचं बोलणं ऐकून पंकज त्रिपाठी हैराण

Sara Ali Khan: : सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी तिनं तिचे वडील सैफ अली खान आणि करीनाचा उल्लेख केला आहे. 

विचित्र हावभाव करत सारा म्हणाली, 'वडील सैफ आणि करीना...'; तिचं बोलणं ऐकून पंकज त्रिपाठी हैराण

Sara Ali Khan on Saif Ali khan and Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या 'मेट्रो…इन दिनों' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावेळी साराला असा प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर ऐकताच सगळ्यांना आश्चर्य झालं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना तिला प्रश्न विचारला की बॉलिवूडमध्ये तिचं आवडतं कपल कोणतं आहे, जे विवाहीत आणि यशस्वी दोन्ही आहे. सगळ्यात आधी हा प्रश्न ऐकताच सारानं थोडे विचित्र एक्सप्रेशन दिली कारण तिनं असा काही प्रश्न विचारण्यात येईल याची कल्पना केली नव्हती, पण त्यानंतर सारानं मजेशीर उत्तर दिलं. 

साराचं आवडतं जोडपं

सारा अली खानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तर सारा गोंधळी आहे हे पाहून नीना गुप्ता या सगळ्या वातावरणाला मजेशीर करण्यासाठी आणि रिपोर्टची थट्टा करण्यासाठी म्हणाला की, जे आनंदी आहे ते कपल का? तर तिथे उपस्थित असलेले सगळेच लोकं हसू लागले. दरम्यान, या सगळ्यात बराच वेळ थांबलेल्या सारानं उत्तर दिलं की 'माझे वडील आणि करीना...'. याचा अर्थ तिचं आवडतं जोडपं हे सैफ आणि करीना आहे.

सैफ आणि करीनाची कोणती गोष्ट आवडते?

पत्रकारानं त्यालाच लागून पुढे प्रश्न विचारला की सैफ आणि करीनाच्या नात्यातील कोणती गोष्ट तिला खूप आवडते? याच्यावर उत्तर देणार याआधी आदित्य रॉय कपूरनं मस्करीमध्ये म्हटलं की 'पुढच्या ट्रेलर लॉन्चला उत्तर मिळेल.' त्यावर संपूर्ण पॅनेल हे हसू लागलं. पंकज त्रिपाठी यात सहभागी झाले आणि मस्तीकरत म्हणाले 'याचं काही वेगळं करून लिहिणार आहात का?'

असं काही होण्याची ही पहिली वेळ नाही, जेव्हा सारानं तिच्या कुटुंबाविषयी काही वक्तव्य केलं आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये सारानं एकदा करीना कपूरसोबत तिच्या बॉन्डविषयी स्पष्टपणे वक्तव्य केलं होतं. जेव्हा करण जोहरनं साराला विचारलं की काय तिनं कधी करीनाला छोटी आई म्हणून हाक मारली आहे का? तर सारा म्हणाली, 'मला असं वाटतं की जर मी करीनाला छोटी आई म्हणून हाक मारली तर तिला नर्वस ब्रेकडाउन होईल.'

दरम्यान, 'मेट्रो…इन दिनों' विषयी बोलायचं झालं तर या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, अनुपम खेर, फातिमा सना शेख, अली फजल आणि शाश्वत चॅटर्जीसोबत अनेक कलाकारा आहेत. अनुराग बसुनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  हा चित्रपट 4 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Read More