Paresh Rawal Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी’ फ्रेंचायझीमधील परेश रावल यांची बाबू भैय्याची भूमिका ही आयकॉनिक आहे. मात्र, चाहत्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा ही माहिती समोर आली की परेश रावल हे ‘हेरा फेरी 3’ मध्ये दिसणार नाही. त्यानंतर खूप मोठा वाद सुरु झाला होता. चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना चित्रपटात येण्याची विनंती करत होते. आता अशी माहिती समोर आली आहे की जो वाद होता, तो संपला असून परेश रावल यांनी या चित्रपटात कमबॅक केलं आहे.
परेश रावल यांनी स्वत: कंफर्म केलं हे की जी काही माहिती होती. जो काही वाद होता तो संपला आहे आणि ते आता कमबॅक करणार आहेत. 'द हिमांशु मेहता शो' नावाच्या एका युट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत परेश रावल यांना विचारण्यात आलं की नेमकी कॉन्ट्रॉवर्सी काय होती? त्यावर उत्तर देत परेश रावल म्हणाले, 'कॉन्ट्रोव्हर्सी काही नाही. माझं हेच आहे की जेव्हा काही गोष्टी लोकांना इतक्या आवडतात तेव्हा त्यांना काळजी करण्याची गरज असते.'
‘हेरा फेरी 3’ मध्ये कमबॅक करण्यावर परेश रावल यांनी म्हटलं की 'प्रेक्षकांसाठी आपली एक जबाबदारी आहे, कारण प्रेक्षक बसले आहेत. ते आपल्यावर इतकं प्रेम करतात. त्यामुळे प्रेक्षकांना ग्राह्य धरू शकत नाही. मेहनत करा. तर माझं म्हणणं तेच आहे की सगळ्यांना एकत्र या, मेहनत करा, त्यापलीकडे जाऊन दुसरं काही नको.'
पुढे जेव्हा परेश रावल यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 'आधी देखील येणारच होते, पण काय आहे की एकमेकांना फाइन ट्यून करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी क्रिएिव्ह लोक आहेत. प्रियदर्शन आहे, अक्षय आहे किंवा सुनील आहे, सगळे अनेक वर्षांपासू मित्र आहेत.'
परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यानंतर अक्षय कुमारची कंपनी केप गुड फिल्मसनं परेश रावल यांना लीगल नोटिस पाठवत 25 कोटी मागितले होते. त्यावर परेश रावल यांनी उत्तर दिलं की इकडे चित्रपटाची स्क्रिप्ट देखील आली नाहीये तर पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. परेश रावल यांना सायनिंग अमाऊंट म्हणून 11 लाख रुपये मिळाले होते. तर त्यांनी ते पैसे व्याजासकट परत दिले. या प्रकरणाला घेऊन चांगलाच वाद पेटला होता.
हेही वाचा : अखेर घटस्फोटावर अभिषेकनं सोडलं मौन; ऐश्वर्यासोबतच्या नात्यातील सिक्रेट उघड
परेश रावल यांचे वकीलांनी सांगितलं की त्यांचे क्लायंटनं हा चित्रपट यासाठी सोडला की त्यांना या चित्रपटासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी अर्थात स्क्रिप्ट किंवा अग्रीमेंट ड्राफ्ट मिळालेलं नाही. दरम्यान, या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत.