Marathi News> मनोरंजन
Advertisement

नेहा-यशच्या लग्नाला परी देईल का परवानगी? व्हिडीओ व्हायरल

'माझी तुमच्या लग्नाला परवानगी....', नेहा आणि यशच्या लग्नाबद्दल काय म्हणाली परी...  

नेहा-यशच्या लग्नाला परी देईल का परवानगी? व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सध्या सर्वत्र  'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi tuzi reshimgath) मालिकेची चर्चा रंगत आहे. मालिकेत आता यश आणि नेहामध्ये प्रेमाचा गुलाब बहरताना दिसत आहे. नेहा आणि यशमध्ये असणारं प्रेम, लग्न करण्याची दोघांची इच्छा, पण यश आणि नेहाच्या लग्नाला परी परी परवानगी देईल का? अशा अनेक मुद्दयांभोवती मालिका फिरताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये यश आणि परी समोरासमोर बसलेले दिसत आहेत आणि परी म्हणते 'माझी तुमच्या लग्नाला परमिशन आहे...' परीने परवारगी दिल्यानंतर यश आणि नेहाच्या चेहऱ्यावरील आनंद व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या परीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परीने नेहा आणि यशच्या लग्नाला परमिशन दिल्यानंतर दोघे कधी लग्न बंधनात अडकतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

परीने लग्नाला परवानगी दिल्यानंतर नेहाचं सत्य यशच्या आजोबांना कळेल तेव्हा ते दोघांच्या लग्नाबद्दल काय निर्णय घेणाक याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एवढंच नाही तर सिम्मी आणि नेहाची वहिनी लग्नात कोणता अडथळा निर्माण करतील ती नाही...याची देखील प्रेक्षकांना चिंता लागली आहे.

 

Read More