Marathi News> मनोरंजन
Advertisement

राजमौली यांच्या‘आरआरआर' सिनेमात झळकणार परिणीती

सिनेमाचे बजेट 300 कोटींचे आहे. 

राजमौली यांच्या‘आरआरआर' सिनेमात झळकणार परिणीती

मुंबई: दिग्दर्शक एस. एस. राजमौली साऊथ इंडस्ट्रीतील दर्जेदार कलाकार आहेत. 'बाहुबली' आणि  'बाहुबली 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. दिग्दर्शक एस. एस. राजमौली सध्या त्यांच्या ‘आरआरआर' सिनेमामध्ये व्यग्र आहेत. दिग्दर्शक एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर' सिनेमात आभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. तिच्यासोबत तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

fallbacks


परिणीती या सिनेमात काम करणासाठी तयार आहे परंतू या सिनेमासाठी तिने भरभक्कम मामधनाची मागणी केली. सिनेमाच्या निर्मात्यांनी ती मागेल तेवढे मानधन देण्याची तयारी दाखवली. सिनेमाची शूटिंग लवकरात-लवकर सुरु करणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. ‘आरआरआर' सिनेमासाठी  एनटीआर आणि राम चरण विशेष मेहनत घेत आहेत. सिमेमाच्या चित्रीकरणासाठी एक वेगळे गाव साकारण्यात येणार आहे. 1920 हा साल लक्षात घेवून या गावाची रुपरेषा साकारण्यात येणार आहे. सिनेमाचे बजेट 300 कोटींचे आहे. 

Read More