Marathi News> मनोरंजन
Advertisement

गरोदरपणातही रेड कार्पेटवर लोकप्रिय सेलिब्रिटीची बिकीनीतच एंट्री; पाहणाऱ्यांनाही काही सुचेना

ही गायिका पहिल्यांदाच अशा रुपात समोर येण्याची ही काही पहिली वेळ नाही

गरोदरपणातही रेड कार्पेटवर लोकप्रिय सेलिब्रिटीची बिकीनीतच एंट्री; पाहणाऱ्यांनाही काही सुचेना

मुंबई : फॅशनचा ट्रेंड फॉलो करता करता काही सेलिब्रिटी अनेकदा मोठ्या हिमतीनं चौकटीबाहेर जात काही नव्या गोष्टी आपल्याश्या करतात. अशाच सेलिब्रिटींच्या यादीत एका गायिकेचं नाव येतं जी गरोदरपणातही तिच्या राहणीमानानं सर्वांच्या नजरा वळवत आहे. 

बेबी बम्प फ्लाँट करणारी ही गायिका पहिल्यांदाच अशा रुपात समोर येण्याची ही काही पहिली वेळ नाही. 

तिनं गरोदरपणाची घोषणाच अशा अनोख्या अंदाजात केली होती. ही गायिका आहे, रिहाना. रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी आता बाळाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. (Rihanna Baby Bump )

दरम्यान, या गायिकेनं नुकतीच पॅरिस फॅशन वीकला हजेरी लावली. जिथं तिच्याकडे पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. 

शिअर ब्लॅत ड्रेसमध्ये रिहाना यावेळी काळ्या रंगाचं लेदर ट्रेंच कोट घेऊन आली. क्नी हाय पॉईंटेड हिल्स घालणारी ही रिहाना यावेळी तिचा हा लूक सुरेखपणे कॅरी करत होती. 

fallbacks

बिकीनी लूक आणखी उठावदार करण्यासाठी तिनं यावेळी गडद रंगाच्या लिपस्टीकला पसंती दिली होती. ज्यामुळं तिच्या लूकला चार चाँद मिळाले होते. 

fallbacks

गरोदरपणातील लकाकी तिच्या चेहऱ्याला आणखी सुरेख बनवून जात होती. फॅशन जगतात रिहानाच्या या लूकला कमालीची पसंतीही मिळाली. 

Read More