Marathi News> मनोरंजन
Advertisement

'परमाणु'ला दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद, कमाईचा आकडा वाढला

'परमाणु'ची 2 दिवसात मोठी कमाई

'परमाणु'ला दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद, कमाईचा आकडा वाढला

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून वादात सापडलेला सिनेमा जॉन अब्राहमचा परमाणु सिनेमा 2 दिवसांपूर्वी रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सध्या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर परमाणूची सध्या धमाल आहे. परमाणुला लोकांची पसंती मिळत आहे. सिनेमाने 2 दिवसात चांगली कमाई केली आहे.

पहिल्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 4.82 कोटी रुपये कमवले होते. शुक्रवारी पेक्षा शनिवारी सिनेमाला चांगलं कलेक्शन मिळालं आहे. शनिवारी सिनेमाने 7.64 कोटी रुपये कमवले आहेत. दोन दिवसात सिनेमाची कमाई 12.46 कोटी रुपये झाली आहे. सिनेमामध्ये जॉनने धमाकेदार एन्ट्री केली आहे. या सिनेमात जॉन शिवाय डायना पेंटी आणि बोमन ईरानी देखील आहे.

Read More