Marathi News> मनोरंजन
Advertisement

'परमाणू'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, लोकांचा चांगला प्रतिसाद

परमाणूला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

'परमाणू'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, लोकांचा चांगला प्रतिसाद

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला सिनेमा परमाणू रिलीज होण्यासाठी खूप वेळ लागला असला तरी सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जॉन आणि डायना पेंटीचा हा सिनेमा परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरणने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात 24 कोटींची कमाई केली आहे. क्रिटिक्सने देखील सिनेमाचं कौतूक केलं आहे. आणि माउथ पब्लिसिटीचा फायदा देखील सिनेमाला होत आहे. सिनेमाची कथा दमदार आहे. परमाणु पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर खास कमाई करु शकला नाही पण नंतर दर दिवशी त्याची कमाई वाढली आहे.

'परमाणू'ने पहिल्या दिवशी 4 कोटी कमवले. दूसऱ्या दिवशी कमाई 58.51 टक्क्यांनी वाढली. दूसऱ्या दिवशी सिनेमाने 7.64 कोटी कमवले. रविवारी सिनेमाला 8.32 कोटी रुपये मिळाले तर सोमवारी सिनेमाने 4.10 कोटी कमवले. आतापर्यंत सिनेमाने 24.88 कोटी रुपये कमवले आहेत. ट्रेड अॅनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

सिनेमा भारतात 1935 स्क्रीनवर रिलीज झाला. देशा बाहेर तो 270 स्क्रीनवर रिलीज झाला. 'परमाणू सिनेमा एकूण 2205 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. 35 कोटींमध्ये हा सिनेमा तयार झाला आहे. सध्या तो हिट होण्याच्या मार्गावर आहे.

Read More