Marathi News> मनोरंजन
Advertisement

पवित्रा पुनियाने घेतला Trollersचा क्लास, म्हणाली- कोणी पण येत शिव्या देवून जातो...

पवित्रा पुनियाने सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चांगलीच भडकलेली दिसत आहे

पवित्रा पुनियाने घेतला Trollersचा क्लास, म्हणाली- कोणी पण येत शिव्या देवून जातो...

मुंबई: बिग बॉस 14 च्या माध्यमातून टीव्ही अभिनेत्री पवित्र पुनियाने बऱ्याचवेळा चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या डॅशिंग स्टाईलपासून ते इजाज खानयांच्या नात्यापर्यंत कायम तिची चर्चा सोशल मीडियावर होत असते. रिअॅलिटी शो संपल्यानंतरही पवित्रा सतत चर्चेत असतो. बऱ्याच वेळा पवित्रा एजाज खानसोबत असलेल्या जवळीक नात्यामुळे ट्रोल होत असते. मात्र पवित्राने ट्रोलर्सला चांगलंच खडसावलं आहे.

पवित्रा पुनियाने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चांगलीच भडकलेली दिसत आहे. ती म्हणते की, तिला काय कोणाच्या शिव्या खाण्याची हौस नाही.  कोणाच्या आयुष्यात काय चाललंय, कोणाला काय त्रास आहे, यामुळे लोकांना काय त्रास आहे? यामुळे मला काहीच फरक पडत नाही. पण तरीही यायचं आणि शिव्या द्यायला सुरुवात करायची. म्हणजे आम्ही काय फक्त तुमच्या शिव्या खायला बसलोय का?''

तसंच व्हिडिओ शेअर करत पवित्राने कॅप्शनमध्ये देखील याचा उल्लेख केला आहे. तीनं लिहिलं आहे की, 'याचा अर्थ गंभीरपणे घ्या ... कोणीही येते, शिव्या देवून जातं. याचा अर्थ काय आम्ही तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी ट्विटरवर आहोत? '

पवित्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पवित्राचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते चांगलेच खूश झालेले दिसत आहेत. ते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. पवित्राचा हा तडफदार अंदाज सर्वांनाच फार आवडला आहे.

Read More