Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलिया-रणबीर नंतर ही अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात, तारीख समोर

आलिया - रणबीर नंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला लगीन घाई, बॉयफ्रेंडसोबत लवकरचं घेणार सप्तपदी  

आलिया-रणबीर नंतर ही अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात, तारीख समोर

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत नव्या आयुष्याला सुरुवात केली. अभिनता विकी कौशल - अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर- अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नंतर अभिनेत्री पायल रोहतगीच्या घरी देखील लवकरचं सनई चौघडे वाजणार आहेत. अनेक वर्ष बॉयफ्रेंडला डेट केल्यानंतर अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र पायलच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. 

पायल रोहतगी आणि तिचा कुस्तीपटू बॉयफ्रेंड संग्राम सिंग 9 जुलै रोजी आग्रा येथे लग्न करणार आहेत, लग्नाबद्दल खुद्द पायलने सांगितलं आहे. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये तीन दिवस या जोडप्याचा शाही विवाह सोहळा रंगणार आहे. 

पायल म्हणाली, "आग्रा ताजमहालसाठी ओळखले जाते, परंतु आग्रामध्ये अशी अनेक हिंदू मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. हिंदू मंदिरांच्या सौंदर्यसाठी आणि त्याबद्दल इतरांना माहिती देण्यासाठी आम्ही तिथे लग्न करत आहोत.' पायलनंतर तिच्या होणाऱ्या पतीने देखील भावना व्यक्त केल्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'पायलला मी पहिल्यांदा आग्रा मथुरा रोडवर भेटलो. आम्ही जुलैमध्ये जेपी पॅलेस, आग्रा येथे लग्न करणार आहोत. मेहंदी, हळदी, संगीत सोहळा तीन दिवस रंगणार. कुटुंबीयांच्या उपस्थितीत हिंदू रितीरिवाजांनुसार आम्ही लग्न करणार आहोत... असं संग्राम सिंग म्हणाला. 

पायन आणि संग्रामने दिल्ली, मुंबई आणि हरियाणामध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबासाठी लग्नानंतर रिसेप्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Read More