Marathi News> मनोरंजन
Advertisement

वायफळ बडबड करणाऱ्या 'या' अभिनेत्रीचं ट्विटर अकाऊंट पोलिसांकडून ब्लॉक

पायल सतत स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक मुद्दे शेअर करत असते. 

वायफळ बडबड करणाऱ्या 'या' अभिनेत्रीचं ट्विटर अकाऊंट पोलिसांकडून ब्लॉक

मुंबई : अभिनेत्री पायल रोहतगी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. पायल सतत स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक मुद्दे शेअर करत असते. सध्या पायलने केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये ती पोलिसांबद्दल भाष्य करताना दिसत आहे. परिणामी मुंबई पोलिसांनी पायलचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहे. पोलिसांनी अकाउंट ब्लॉक केल्यामुळे तिचा रागाचा पारा चढला आहे. त्यानंतर चाहत्यांनी पायलला पाठिंबा देत, मुंबई पोलिसांना ट्रोल केले आहे. 

त्यानंतर, मुंबई पोलिसांना टॅग करत पायलने लिहले आहे की, 'मुंबई पोलिसांनी मला का ब्लॉक केले आहे? मला आता या देशात राहाण्यासाठी देखील भीती वाटत आहे. पोलीस माझ्यासोबत असा पक्षपात कसे करू शकतात? आता मला कळत आहे की माझे कुटुंब हिंदूंबद्दल बोलण्यापासून का थांबवायचे'. 

पायल याआधीही अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत आलीय. पायलचे बॉलिवूडमधील करियर काही समाधान कारक राहिले नाही. पण सोशल मीडियावरील तिच्या वक्तव्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. आतापर्यंत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारांवर निशाना साधला आहे. 

Read More