Marathi News> मनोरंजन
Advertisement

PHOTO : आएशाचं हे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल, फोटो व्हायरल

तिच्या या फोटोंवर सोशल मीडियावर अतिशय विचित्र अशा कमेंटस् दिसत आहेत

PHOTO : आएशाचं हे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल, फोटो व्हायरल

मुंबई : तुम्हाला टार्झन द वन्डर कार, वॉन्टेड किंवा डोर फेम अभिनेत्री आठवतेय का? अतिशय सुंदर, चुलबुली आणि मेकअप शिवायही मोहक दिसणारी... होय तीच आएशा टाकिया... परंतु, आता आएशा टाकियाचं ते रुप तुमच्या नजरेसमोर आलं असेल तर नव्या रुपातील तिचे फोटो पाहून  तुम्हाला कदाचित तिला ओळखणंही कठिण होईल... 

नुकतेच समोर आलेल्या फोटोंमध्ये आएशानं आपला चेहरा-मोहराच गमावलेला दिसतोय... तिच्या या फोटोंवर सोशल मीडियावर अतिशय विचित्र अशा कमेंटस् दिसत आहेत. 

fallbacks
 

इन्स्टाग्रामवर एका युझरनं आएशाच्या लूकची खिल्ली उडवत तिला 'राखी सावंत'ची उपमा दिलीय... तर दुसऱ्यानं किम कर्दशियनची... 

एका युझरनं लिहिलंय 'क्या से क्या हो गया, सर्जरी बेवफा हो गई'... 

तर एकानं आएशाला 'बुरखा परिधान करून दुसऱ्यांना घाबरवणं थांबव' असा न मागताच सल्लाही देऊन टाकलाय. 

यापूर्वीही आएशा टाकियाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता... आएशानं ओठांची शस्रक्रिया केल्याचंही म्हटलं जात होतं... यावर स्पष्टीकरण देताना आपण कोणत्याही पद्धतीची शस्रक्रिया केली नसल्याचं आएशानं म्हटलं होतं... 

 

fallbacks
 

 

१८ वर्षांपू्र्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण 

आएशा टाकियानं २००४ मध्ये आलेल्या टार्झन : द वंडर कार या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमातील अभिनयासाठी तिला फिल्मपेअर बेस्ट फीमेल डेब्यू अॅवॉर्डही मिळालं होतं. 

यानंतर आएशानं दिल मांगे मोर, सोचा ना था, शादी नंबर १, सुपर, होम डिलीवरी, शादी से पहले, ये होता तो क्या होता, डोर, सलाम ए इश्क, क्या लव स्टोरी है, फूल अॅन्ड फायनल, कॅश, संडे, दे ताली, वॉन्टेड, पाठशाला यांसारख्या सिनेमांतून काम केलं... २०११ साली आलेला 'मोड' हा तिचा अखेरचा सिनेमा ठरला. 

आएशानं आमदार अबू आझमी यांचा मुलगा आणि व्यावसायिक फरहान आझमी याच्यासोबत विवाह केला... त्यानंतर तिनं बॉलिवूडला रामराम ठोकला. फरहान - आएशा या जोडप्याला एक मुलगाही आहे. 

Read More