Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून रूपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेला चित्रपट २०१९ साली प्रदर्शित करण्यात आला होता.  

...म्हणून रूपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील चित्रपटगृह मार्च महिन्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारकडून घेण्यात आला. मात्र देशात 'अनलॉक ५'अंतर्गत अनेक नियम शिथिल करण्यात आले आहे. तर येत्या १५ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता विवेक ऑबेरॉय स्टारर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेला चित्रपट २०१९ साली प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असल्यामुळे मला फार आनंद होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. 

शिवाय, या चित्रपटाला सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण टीमने अत्यंत मेहनत घेतली. जेव्हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल झाला तेव्हा चित्रपटाचा आनंद प्रत्येकाला घेता आला नाही. त्यामुळे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिली आहे.

चित्रपट गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार रूपेरी पद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांनी केले आहे. 

Read More