Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीकडून बेदम मारहाणीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा 'तो' व्हिडिओ लीक

पण आता अभिनेत्रीसोबत धक्कादायक असा प्रकार घडला आहे.

पतीकडून बेदम मारहाणीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा 'तो' व्हिडिओ लीक

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रीय असते. पण आता अभिनेत्रीसोबत धक्कादायक असा प्रकार घडला आहे. ज्यामुळे तिला मोठी दुखापत झाली आहे. घरगुती हिंसाचाराला पूनम पांडे बळी गेली आहे.

पूनम पांडेला तिचा पती सॅम बॉम्बे याने बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. पूनम पांडेला सोमवारी रात्री उशीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. सॅम बॉम्बेने पूनमला बेदम मारहाण केली. तसेच तिचं डोकं भिंतीवर आपटलं. 

दरम्यान, अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पूनम खूप आनंदी आणि मस्ती करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये पूनमच्या पतीचा हातही दिसत आहे, जो तिच्यासोबत मजामस्ती करत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पूनम 'माणिके मांगे हिते' गाण्यावर तिचा व्हिडिओ शूट करत आहे, त्यादरम्यान ती हटके एक्सप्रेशन देत आहे आणि पतीसोबत एन्जॉय करत आहे. 

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतरचा ही पूनमचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं दिसून येतंय. ज्यात तिने एक रिल व्हिडिओ शूट केला आहे, या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावर दुखापत झाल्याची खून देखील दिसून येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पूनम पांडेच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी सॅम बॉम्बेला पोलिसांनी अटक केली आहे. सॅम बॉम्बे याला कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पूनम पांडे हिने पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. पूनम पांडेने तिच्या पतीवर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. 

काय आहे प्रकरण?

सॅमची पहिली पत्नी अलविरासोबत बोलण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. पूनम आणि सॅममध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याचा सॅमला राग आला. त्याने पूनमचे ​​केस पकडून तिला ओढलं.

तिचं डोकं भिंतीवर आपटलं. तिला बेदम मारहाण देखील केली, असं पूनमने पोलिसांना सांगितलं आहे. सॅमनं पूनमच्या चेहऱ्यावर मुक्का मारल्याने तिचा चेहरा आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे आपल्याला कमी दिसत असल्याची तक्रार पूनमने सांगितलं आहे. 

लग्नानंतर केवळ 12 दिवसांत पोलिसांत या दोघांचा वाद पोहोचला होता. पूनम आणि सॅम लग्नापूर्वी 2 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

Read More