Kerala Rapper Vedan : लोकप्रिय मल्याळम रॅपर आणि संगीतकार वेदान हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वेदान आणि त्याच्यासोबत आठ इतर लोकांना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांना अटक करण्याचं कारण म्हणजे त्यांच्या फ्लॅटमध्ये गांजा सापडला आहे. याविषयी पोलिसांनी सोमवारी माहिती दिली आहे. कोची येथे असलेल्या हिल पॅलेस पोलिस स्टेशनच्या टीमनं 27 एप्रिल रविवारी रात्री मिळालेल्या एका माहितीनंतर सोमवारी 28 एप्रिल रोजी सकाळी एका फ्लॅटवर छापा मारला आहे. छापेमारी दरम्यान, त्यांना वेदानच्या फ्लॅटमध्ये जवळपास 6 ग्रॅम गांजा सापडला आहे. जेव्हा हा तपास करण्यात आला तेव्हा वेदान त्या फ्लॅटमध्ये होते. जो तिथे त्याच्या आठ मित्रांसोबत स्टेज शोनंतर आला होता.
पोलिसांनी त्या ठिकाणाहुन 950000 लाख रुपये रोकड जप्त केली आहे. सुरुवातीला चौकशी करत असताना वेदाननं गांजा घेतल्याचे कबूल केलं आणि हे देखील सांगितलं की त्याला हे ड्रग्ज कुठून मिळाले होते. सध्या पोलिस हे वेदान आणि त्याच्या मित्रांची चौकशी करत आहेत. चौकशीनंतर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण गांजा मोठ्या प्रमाणात नसल्यानं त्यांचा जामीन मिळाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे हे सगळं गांजावर थांबलं नाही तर पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना बिबट्याचा दात मिळाला. हा दात त्याच्या चेनमध्ये लटकला होता. पोलिसांनी लगेच त्याची माहिती वन विभागाला देली. तर या प्रकरणात वन मंत्री ससीन्द्रन म्हणाले, 'जेव्हा तपासात हे समोर आलं की तो बिबट्याचा दात आहे तर वन विभागानं वेदानच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्याला अटक केली. आता हा तपास करण्यात येत आहे की हा दात त्यांनी कुठून मिळाला.'
वेदान हा त्रिशूरचा राहणारा आहे. वेदान हा त्याच्या व्हायरल झालेल्या रॅप व्हिडीओ 'व्हॉइस ऑफ द वॉइसलेस' मुळे चर्चेत होती. त्यानंतर त्यानं अनेक चित्रपटांसाठी गाणं गायलं आहे. नुकतंच त्यानं सुपरहिट ठरलेल्या 'मंजुम्मेल बॉइज' च्या प्रोमो सॉन्ग 'कुथांथ्रम' मध्ये म्यूजिक दिग्दर्शक सुशीन श्यामसोबत काम केलं आहे. सध्या मल्याळम इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सला घेऊन सतत काही ना काही ऐकायला येतंय आणि पोलीस सतत कारवाई करताना दिसत आहेत.
या आधी 27 एप्रिल रोजी कोचीमध्येच दोन लोकप्रिय मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान आणि अशरफ हमजा या दोघांना हायब्रिड गांजाचे सेवन केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत शालिफ मोहम्मद नावाच्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली होती. एफईएफकेए (FEFKA) नं दोन्ही दिग्दर्शकांना सध्या निलंबित केलं आहे.
हेही वाचा : 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? याचं उत्तर देताना काय बोलून गेले केदार शिंदे...
खालिस रहमाननं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अलप्पुझा जिमखाना' या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होते आणि त्यानं ‘उंडा’, ‘वे थल्लूमाला’ आणि ‘अनुराग करिकिन वेल्लम’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर अशरफ हमजाला त्याच्या 'थमाशा', 'भीमंते वाजी' आणि 'सुलेखा मंजिल' सारख्या चित्रपटांसाठी ओळखतात.