Marathi News> मनोरंजन
Advertisement

मिया खलिफाकडून शरीराच्या या भागाची बोटॉक्स ट्रीटमेंट

 मिया खलिफा शरीरावर होणाऱ्या उपचारांबद्दल नेहमी उघडपणे बोलत असते.

मिया खलिफाकडून शरीराच्या या भागाची बोटॉक्स ट्रीटमेंट

मुंबई : पॉर्न इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा मिया खलिफा, तिच्या स्पष्ट शैलीसाठी देखील मिया ओळखली जाते. ती कोणत्याही मुद्द्यावर आपलं मत स्पष्टपमे मांडण्यास मागेपुढे पाहत नाही. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांना देते. मग हे प्रकरण कितीही विचित्र किंवा लपवलेलं असलं तरीही. मियासुद्धा तिच्या शरीरावर होणाऱ्या उपचारांबद्दल नेहमी उघडपणे बोलत असते. यावेळी पुन्हा एकदा मिया खलिफाने तिचं सौंदर्य टिकवण्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली आहे.

काखेत घेतले उपचार 
यापूर्वी मिया खलिफाने सोशल मीडियावर सांगितलं होतं, की तिने तिच्या नाकाची शस्त्रक्रिया केली आहे. तिने एका फोटोसोबत ही गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता मियाने आणखी एक खुलासा केला आहे. वास्तविक, मियाने आता तिच्या काखेत घेतलेल्या बोटॉक्स उपचाराचा खुलासा केला आहे. मिया खलिफाने नुकतंच तिच्या आर्मपिटसाठी बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली.

सोशल मीडियावर कारण
मिया खलिफाला नुकतंच तिच्या काखेत बोटॉक्सचं ट्रिटमेंट घेतली आहे. तिने ही गोष्ट आपल्या इन्स्टा स्टोरीद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे आणि त्याची प्रक्रियाही शेअर केली आहे. मियाच्या म्हणण्यानुसार, तिने आपल्या काखेत येणारा घाम कायमचा घालवण्यासाठी ही ट्रीटमेंट घेतली आहे.

ही समस्या होती
मियाने या पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे की, तिला 'हायपरहायड्रोसिस' आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तिने बोटॉक्स उपचारा घेण्याचं ठरवलं आता मियाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

Read More