Marathi News> मनोरंजन
Advertisement

जाणून घ्या ही कोण अभिनेत्री आहे, जिने प्रभुदेवाच्या विवाहित जीवनात आणला होता अडथळा

 प्रभुदेवाने पत्नी रामलतासोबतचे सगळे संबंध तोडून वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. 

जाणून घ्या ही कोण अभिनेत्री आहे, जिने प्रभुदेवाच्या विवाहित जीवनात आणला होता अडथळा

मुंबई : आपल्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी साऊथ अभिनेत्री नयनताराचा आज वाढदिवस आहे. नयनतारा जेव्हा प्रभुदेवाच्या प्रेमात पडली तेव्हा तिला त्याच्याशी लग्न करण्याची ईच्छा होती ऐवढचं नव्हे तर तिला त्यांचा लग्नाची स्वप्नही पडू लागली होती. एवढंच नाही तर प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्मही सोडला होता. 

नयनताराने आर्य समाज मंदिरात येऊन हिंदू धर्म स्वीकारला. यासोबतच प्रभुदेवाच्या नावाचा एक टॅटूही तिने बनवला  होता. मात्र, नयनतारा जेव्हा प्रभुदेवाशी लग्न करण्याचं स्वप्न पाहत होती. त्याचवेळी तिचं लग्न झालं होतं. 2008 मध्ये नयनताराने प्रभुदेवाला डेट करायला सुरुवात केली होती. नयनतारा आणि प्रभुदेवामध्ये सुरू असलेल्या या बातम्या आता त्यांच्या घरापर्यंत पोहोचू लागल्या होत्या. त्यामुळे प्रभुदेवाच्या घरात यावरुन वादानादही सुरु झाला होता.

fallbacks

प्रभुदेवाची पत्नी रामलता हिनेही आपला पती नयनतारासोबत लिव्हनमध्ये राहत असल्याचा अर्ज न्यायालयात केला होता. त्यानंतर प्रभुदेवाने पत्नी रामलतासोबतचे सगळे संबंध तोडून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर पुढच्याच वर्षी नयनताराने जाहीर केलं की, तिने प्रभुदेवासोबतचे सगळे संबंध तोडले आहेत. त्यामुळे प्रभुदेवाकडे ना रामलता होती ना नयनतारा. जीवनाच्या या अपघाताने प्रभुदेवा चांगलाच तुटला. मात्र, आता नयनताराने दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत एंगेजमेंट केली आहे. 

Read More