Marathi News> मनोरंजन
Advertisement

Prajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा

अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.  

Prajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा

Prajakta Mali: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) कायमच चर्चेत असते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. रानबाजार या वेब  सीरीजनंतर प्राजक्ता मोठ्या पडद्यावर दिसली नाही. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra ) मधून प्राजक्ता उत्तम निवेदिका म्हणून दिसत आहे. पण तुम्हाला माहितेय का प्राजक्ता माळीने बॉलिवूडचा किंग खान शाहरुक खानबरोबरही (Shah Rukh Khan) काम केले आहे. याबाबचा प्राजक्ताने शाहरुक खानबरोबर स्क्रिन शेअर करत माहित नसलेला रंजक किस्सा सांगितला आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती शाहरुखबरोबर काम केल्याचा तो रंजक किस्सा शेअर केला. अभिनेता शाहरुक खानचा स्वदेश (Swades Movie) या चित्रपटात प्राजक्ताने काम केल आहे. हे ऐकून आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे. या चित्रपटात प्राजक्ताने अगदी छोटंसं काम केल्याचे दिसून आले आहे. 

वाचा: सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते हे 5 क्रिकेटपटू, एकाने तर महिलेसमोरच... 

यावेळी प्राजक्ताने सांगितले की, शाहरुक बरोबर काम करताना मी एक नाही तर सतरा वेळी धडकली आहे. असं प्राजक्ताने या व्हिडीओमध्ये सांगताना दिसून आली आहे. त्याचबरोबर तिने सिनेमातील तो सीन देखील सांगितला, ज्यामध्ये प्राजक्ता माळीने काम केलं आहे. तिने सांगितले की, तो लायब्ररीमध्ये असतो आणि ती हिरोईन पत्ता सांगते त्याला आणि तो लिहून घेत असतो. ती त्याच्याकडून पुस्तक घेते आणि त्यांने पैसे देते, त्यानंतर तिला सुट्टे पैसे द्याचे असतात. तेवढ्यात ती निघून जाते. आता ती निघून गेली आहे असं दाखवायचं आहे. तेव्हा तो धावत धावत बाहेर येतो मग आता ती हिरोइन निघून गेली पाहिजे म्हणून मध्ये दोन मुलींना धडकतो त्यापैकी एक मी आहे. 

पुढे ती म्हणाली, 'मी शाहरुख खानला धडकली आणि एक नाही तर सतरा वेळा धडकलीये. कारण 17 वेळा रिटेक घेतला आहे. कारण शाहरुख खानला कोण जाऊन धडकेल? तो जवळ यायचा तेव्हा मी बाजूला जायचे त्यानंतर त्याने मला जवळ बोलावलं आणि म्हणाला, हॅलो बेटा, आपना यहा से सिधा आईयेगा, सिधे. ठिकये. ऑल द बेस्ट. तेव्हा त्यानीच अँडजस्ट केलं असणार आम्हाला' असं प्राजक्ता माळीने व्हिडीओमध्ये किस्सा सांगितला आहे. 

Read More