Prajakta Mali Mumbai House : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्राजक्ता ही या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तिनं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ता ही मुळची पुण्याची असली तरी अनेक वर्षांपासून ती कामानिमित्तानं मुंबईत आहे. तर तिला मुंबईत येऊन जवळपास 10 वर्ष झाले आहेत. आता मुंबईत आणि त्याच घरात एक दशक घालवल्यानंतर प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं घराला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूजा केल्याचे दिसते.
प्राजक्तानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिनं तिचा आनंद आणि तो दिवस कसा व्यथित केला याविषयी सांगितलं. प्राजक्तानं हा खास दिवस तिच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा मित्रपरिवारसोबत साजरा केला आहे. प्राजक्ता माळीनं फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की 'मी आणि माझं घर...10 वर्ष झाली. विश्वासच बसत नाही. वेळ किती पटकन जातो. या घरानं मला कम्फर्ट, शांतता आणि मुंबईत राहण्याचं एक कारण दिलं. या घरानं माझ्या आयुष्यातील आणि करिअरमधील सर्व चढ उतार अर्थात माझा संघर्ष पाहिला. इथेच मी नाचले, रडले आणि काय काय नाही केलं. या घरानं सगळं पाहिलं आहे. हे माझं पहिलं घर आहे आणि कायम माझ्यासाठी खास राहील.'
पुढे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कुटुंबाविषयी बोलताना प्राजक्ता म्हणाली, 'आर्ट ऑफ लिव्हिंगचं माझं कुटुंब आज घरी आलं होतं. गुरु पूजा, रुद्रपूजा आणि भजनानं घरात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आमचा छान वेळ गेला. इतकं सुंदर घर आणि कुटुंब मला लाभलं आहे, याबद्दल मी फक्त आभार मानू शकते. मला जे काही मिळालं त्यासाठी आभारी आहे.'
हेही वाचा : पद्मश्रीने सन्मानित झाल्यानंतर अशोक सराफ यांचं विमानत खास स्वागत! फ्लाइट कॅप्टन म्हणाली, 'माझे...'; Video Viral
दरम्यान, प्राजक्ताच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती नुकतीच 'चिकी चिकी बुबूम बूम' या चित्रपटात दिसली होती.