Marathi News> मनोरंजन
Advertisement

Prajakta Mali ला लग्नासाठी मराठी मुलगा नको, तर...; प्राजक्ताविषयी तिच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा

Prajakta Mali नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी तिला मराठी मुलाशी लग्न करायचे नाही हे समोर आले आहे तर त्याशिवाय प्राजक्तानं आता पर्यंत लग्न का केलं नाही हे देखील समोर आलंय. प्राजक्ताची ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

  Prajakta Mali ला लग्नासाठी मराठी मुलगा नको, तर...;  प्राजक्ताविषयी तिच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा

Prajakta Mali Marriage : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची 'रानबाजार' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्राजक्ता माळीची ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन पासून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, सध्या प्राजक्ता माळी ही एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. प्राजक्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. (Prajakta Mali Wedding) 

प्राजक्तानं ही मुलाखत ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला मुलाखत दिली. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात प्राजक्तानं हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की प्राजक्ता मनमोकळेपणानं बोलताना दिसत आहे. यावेळी प्राजक्ताला तिच्या खासगी आयुष्यापासून सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी प्राजक्ता तिच्या लग्नाच्या बातम्यांविषयी बोलली आहे. यावेळी प्राजक्ताला विचारण्यात येत की ‘तू पुढच्या वर्षी लग्न करतेस’, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, 'अरे, हे दरवर्षी म्हटलं जातं. 2018 पासून हे सर्व सुरु आहे. यावर्षी नाही नाही पुढच्या वर्षी असं सर्व सुरु आहे. पण अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करायला नको.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी सांगताना प्राजक्ता म्हणाली, 'काही प्रेक्षकांची इच्छा आहे की मी लवकराच लवकर लग्न करावं, तर काही प्रेक्षकांची इच्छा आहे की मी लग्न करू नये. त्या मुलांची अशी इच्छा आहे की मला हिला भेटायचं, त्याशिवाय हिचं लग्न झालं नाही पाहिजे. त्यामुळे माझ लग्न रखडलंय.'

हेही वाचा : कौटुंबिक वाद सुरु असतानाच Nawazuddin Siddiqui नं घेतली राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्थ'वर नेमकी काय चर्चा?

हे ऐकताच प्राजक्ताची मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवे म्हणाली, ‘तुला कुठे महाराष्ट्रीयन मुलगा हवाय, तुला कोण हवय ते सांग ना.’ त्यावर उत्तर देत प्राजक्ता बोलते की तिला दाक्षिणात्य कलाकार खूप आवडतात. त्यांच्यावर तिचे क्रश आहे. पण कोणीही असलं ना, तरी शेवटी आपण त्याला मराठीच बनवायचं.

Read More