Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्राजक्ता माळी लग्न करणार नाही? लग्नाबद्दल अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

Prajakta Mali on Marriage : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्यावर वक्तव्य केलं आहे. 

प्राजक्ता माळी लग्न करणार नाही? लग्नाबद्दल अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

Prajakta Mali on Marriage : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्तानं आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि सीरिजही केल्या. तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ती नेहमीच पुढे असते. प्राजक्ताचे चाहते तिच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन असतात. ती काय करते काय नाही करत... दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. खऱ्या आयुष्यात ती कोणावर प्रेम करते आणि तिच्या लग्नाविषयी तिनं वक्तव्य केलं आहे.

प्राजक्ता सध्या तिच्या तीन अडकून सीताराम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे. अशात प्राजक्ता अनेक मुलाखती देत असताना एका मुलाखतीत तिनं तिच्या खऱ्या आयुष्यातील प्रेम आणि लग्नाविषयी वक्तव्य केलं आहे. खऱ्या आयुष्यात प्राजक्ता माळी कधी प्रेमात पडणार आणि लग्नाच्या बेडीत कधी अडकणार? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर गंमतीत उत्तर देत प्राजक्ता म्हणाली की 'वाट बघा'. प्रेमात आहेच मी, स्वत:च्या आयुष्याच्या... मला असं वाटतं की प्रत्येकानंच असलं पाहिजे. कोणाच्या दुसऱ्याच्या प्रेमात का पडायचं? तुम्ही स्वत:च्या आयुष्याच्याही प्रेमात असू शकता, जे की मी पूर्णपणे आहे. मी सतत अशी हसत असते ते या प्रेमामुळेच शक्य आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे लग्नाच्या बेडीत अडकण्यावर प्राजक्ता म्हणाली की 'बेडीत अडकणं, कुठेतरी बंधनात अडकून राहणं हे माझ्या स्वभावात नाही. हे माझ्या स्वभावाच्या विरोधात आहे, कदाचित होणारही नाही. काही सांगता येत नाही.'

हेही वाचा : शाहरुखच्या जागी विजयला घ्यायचे होते? 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीचा खुलासा...

प्राजक्ता ही एक उत्तम अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ता आता फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत ती एक बिझनेस वूमन देखील आहे. तिचं स्वत: चं एक दागिन्यांचं ब्रँड असून ती प्राजक्ताराज असं त्या ब्रँडचं नाव आहे. प्राजक्ता हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसते. तिचे कार्यक्रमातील लूक हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 

Read More