Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या 56 व्या वर्षी Prakash Raj यांनी पुन्हा केलं लग्न; मुलासाठी उचललं मोठं पाऊल

 'सिंघम' चित्रपटातील खलनायकाच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

वयाच्या 56 व्या वर्षी Prakash Raj यांनी पुन्हा केलं लग्न; मुलासाठी उचललं मोठं पाऊल

मुंबई : बॉलिवूड आणि साउथचे सुपरस्टार प्रकाश राज (Prakash Raj ) सध्या तुफान चर्चेत आले आहेत. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तितकचं खास आहे. प्रकाश राज यांनी वयाच्या 56व्या वर्षी पुन्हा लग्न केलं आहे. आश्चर्य वाटलं ना... प्रकाश राज यांनी पत्नी पोनी वर्मासोबत पुन्हा लग्न केलं आहे. पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रकाश राज आणि पोनी वर्मासोबत पुन्हा लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'आम्ही आज रात्री पुन्हा लग्न केलं आहे... कारण आमचा मुलगा वेदांत आमचं लग्न पाहायचं होतं...' असं लिहिलं आहे. 

प्रकाशराज यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर; आतापर्यंत त्यांनी 'वॉण्टेड', 'सिंघम',  Ghilli, Wanted, Anniyan, आणि Pokiri या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. Movie Artistes Association (MAA) या संघटनेसाठी सध्या ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होत आहेत. हैदराबादमध्येच ही निवडणूक पार पडणार आहे.  

Read More