Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रार्थना बेहेरेला लग्नाआधीच मुलं! प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली...

Prarthana Behere :  प्रार्थना बेहेरेनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. 

प्रार्थना बेहेरेला लग्नाआधीच मुलं! प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली...

Prarthana Behere : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट 'चिकी चिकी बुबूम बुम' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणं आणि तिचा लूक चांगलाच चर्चेत राहिला आहे. सध्या प्रार्थना ही तिच्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशावेळी प्रार्थना ही वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा देखील करताना दिसते. अशात नुकत्याच एका कार्यक्रमात प्रार्थनाला तिला 15-16 मुलं आहेत याविषयी विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देत प्रार्थनानं जे उत्तर दिलं त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

प्रार्थनानं नुकतीच सुमन म्युझिक मराठीच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी प्रार्थनाला एक मजेशीर प्रश्न विचारला तो म्हणजे तू 15-20 मुलांची आई आहेस आणि तू हे सगळ्यांपासून हे लपवून ठेवलं असं आम्ही ऐकलंय. या प्रश्नावर उत्तर देत प्रार्थना म्हणाली, "हो, हे खरं आहे. माझा एक मुलगा तर लग्नाआधीचा होता. त्याचं नाव 'गब्बर' आहे.' प्रार्थनाचं हे उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की गब्बर कोण आहे?" तर गब्बर हा तिचा मुलगा नसून तिचा श्वान आहे. तिच्या श्वानाचं नाव गब्बर आहे. प्रार्थनाला प्राणी खूप आवडतात. तर तिच्याकडे एकूण 7 श्वान आहेत. तर तिच्या फार्महाऊसवर देखील आणखी अनेक प्राणी आहे. तिच्या फार्महाऊसवर असलेल्या प्राण्यांविषयी बोलायचं झालं तर तिथे गायी आणि 10-12 घोडे आहेत.

या प्राण्यांविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली, 'हिच आमची मुलं आहेत. मुळात त्यांची काळजी घेणं सोपं नाही, पण त्यांचं प्रेम हे सगळ्यात मोल्यवान आहे. त्यामुळे आम्ही आता ठरवलंय की मानव मुलं नको, हीच आमची मुलं आहेत. प्रार्थनाच्या नवऱ्याचं नाव अभिषेक जावकरला देखील प्राणी खूप आवडतात. तो देखील एक प्राणी प्रेमी आहे.' 

हेही वाचा : मिका सिंगनं शाहरुख, अमिताभ यांना का भेट दिलेली 50 लाखांची हिरेजडित अंगठी?

नवऱ्याच्या प्राण्यांवरील प्रेमा विषयी बोलताना प्रार्थना म्हणाली, 'प्राण्यांना घेऊन अभिषेक खूप जास्त पजेसिव्ह आहे. त्याला तर लहानपणापासूनच प्राण्यांची आवड आहे.' 

Read More