Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO: ...अन् टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले चक्क धर्मवीर आनंद दिघे, पाहण्यासाठी जमली गर्दी

Prasad Oak at Timbhi Naka:  प्रसाद ओकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याचा धर्मवीर पार्ट 2 आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

VIDEO: ...अन् टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले चक्क धर्मवीर आनंद दिघे, पाहण्यासाठी जमली गर्दी

Prasad Oak at Timbhi Naka: मागच्या वर्षी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातून अभिनेता प्रसाद ओक यांनं धर्मवार आनंद दिघे यांची भुमिका साकारली होती. मागील वर्ष हे प्रसाद ओकसाठीही प्रचंड महत्त्वाचे होते. कारण त्यानं दिग्दर्शित केलेला 'चंद्रमुखी' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातून अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या चित्रपटातील 'चंद्रा' हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळली होती आताही या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटातील गाणं हे आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यासोबत त्याचा 'धर्मवीर' हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. आताही या चित्रपटाची जोरात चर्चा सुरू होती. आता या चित्रपटाचा पुढील भाग हा प्रदर्शित होणार आहे. 

'धर्मवीर 2' या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या भुमिकेतून प्रसाद ओक यानं टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचे त्यानं दर्शन घेतले होते. सध्या याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. तेव्हा याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. यावेळी प्रसाद ओकनंही हा व्हिडीओ शेअर केला आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या रूपात तो यावेळी ठाण्याच्या टेंभी नाका येथे पोहचला होता आणि इथल्या देवीचं त्यानं मनोभावे दर्शन घेतले. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या याच व्हिडीओची. त्याच्या या व्हिडीओखाली चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. 

हेही वाचा : '...देशमुखाचं शेंडेफळं' अमृतानं प्रसादसाठी घेतला उखाणा; केळवणाचे फोटो पाहिलेत का?

यावेळी प्रसादनं दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि मनोभावे आरती केली. यावेळी त्यानं अचानक ही भेट घेतल्यानं भाविकांना आश्चर्याचा धक्काच बसला. ''मा. गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या रुपात आईचं इतक्या जवळून दर्शन मिळणं हे मी माझं परमभाग्य समजतो…!!! काल देवीचे आशीर्वाद घेऊन #धर्मवीर २ चा मुहूर्त शॉट घेतला…!!! चित्रीकरण लवकरच सुरु होईल…!!! पहिल्या भागाइतकंच प्रेम आपण दुसऱ्या भागावरही कराल अशी आशा करतो…!!!'' असं कॅप्शनं त्यानं आपल्या या व्हिडीओसोबत पोस्ट केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या त्याच्या या व्हिडीओची चर्चा आहे. आता या आगामी चित्रपटाचे लवकरच शुटिंग होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 

Read More