Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्मिता पाटील यांच्या आठवणीत Prateik Babbar नं बदललं स्वत:चं नाव...

Prateik Babbar Changed his name : नाव बदलण्याच्या निर्णायावर काय आहे कारण याचा खुलासा प्रतीक बब्बरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. प्रतीकनं त्याची आई स्मिता पाटील यांच्या आठवणीत नावात हा मोठा बदल केला आहे. त्याच्या या निर्णयानं अनेकांना आनंद झाला आहे. 

स्मिता पाटील यांच्या आठवणीत Prateik Babbar नं बदललं स्वत:चं नाव...

Prateik Babbar Changed his name : बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर हा नेहमीत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो. कधी त्याची लव्ह लाइफ तर कधी त्याचे आणि वडिलांचे असलेले संबंध सगळ्याच गोष्टी या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याशिवाय प्रतीक नेहमी आणखी एका गोष्टीविषयी बोलताना दिसतो आणि ती म्हणजे त्याची आई स्मिता पाटील आहेत. प्रतीक हा स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे. प्रतीकला जन्म दिल्यानंतर काही प्रेग्नंसी कॉम्पलिकेशन्समुळे त्यांचे निधन झाले. दरम्यान, प्रतीक बब्बरनं त्याचं नाव बदललं आहे. त्यानं बदललेल हे नाव त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही केलं आहे. 

नाव बदलण्याच्या निर्णयावर प्रतीकनं DNA ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि आजी आजोबांच्या आशीर्वादाने मी माझ्या नावाबरोबर माझ्या आईचं आडनाव जोडायचं ठरवलं आहे. हा निर्णय थोडा भावनिक आणि थोडा अंधश्रद्धेशी जोडलेला आहे. माझं नाव जेव्हा मोठ्या पडद्यावर झळकेल तेव्हा माझ्या आईच्या योगदानाची मला आणि तिच्या लाखों चाहत्यांना आठवण व्हावी, तिची विसर मी कोणाला पडू नये ती सगळ्यांना लक्षात रहावी अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या नावात आणि आडनावात आईचं आडनाव लावलं आहे. हेच माझं स्क्रिनवरच नाव देखील असेल".

fallbacks

आपले निर्णय काही अंशी समजुतींवर आणि काही अंशी भावनांवर आधारल्याचं सांगत पुढे प्रतीक, म्हणाला "जेव्हा माझे नाव एखाद्या चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये किंवा इतरत्र दिसेल, तेव्हा मला माझे नाव तसेच माझ्या आईच्या विलक्षण आणि गौरवशाली वारशाची सगळ्यांना आठवण व्हावी असे मला वाटते. यासोबतच माझी आई स्मिता पाटील किती उत्तम कलाकाक होती हे देखील आठवेल".

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Adipurush Action Trailer : सीताहरण नेमकं कसं झालं? 'आदिपुरुष'च्या ट्रेलरमधून साकारली थरारक दृश्य, पाहा Video

प्रतीकचा जन्म 1986 साली झाला होता. त्याच्या जन्माच्या काही आठवड्यांनानंतर प्रेग्नंसी कॉम्पलिकेशन्समुळे स्मिता पाटील यांचे निधन झाले होते. आईला श्रद्धांजली वाहत प्रतीक, म्हणाला "मी जे काही काम केलं किंवा मी ज्यात माझी एनर्जी लावली त्या सगळ्यात माझी आई माझ्यासोबत असेल. असं नाही की आधी माझी आई नव्हती. पण माझ्या नावाच्या रुपात तिचं अखेरचं नाव त्यात असेल तर भावनिकदृष्ट्या मला अजून मजबूत वाटेल असे सांगितले. यंदाच्या वर्षी आईला जाऊन 37 वर्षे होतील, पण तिला कोणी विसरलं नाही. मी हा प्रयत्न नक्की करेन की तिला कधीच कोण विसरणार नाही. स्मिता पाटील माझ्या नावानं जिवंत राहिल."

Read More