Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अजून काही ठरलं नाही', मुग्धा-प्रथमेश अखेर खरं बोलले...

Mugha Vaishapayan and Prathmesh Laghate: प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर प्रश्नोत्तरांचा भाडिमार सुरू झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चाही रंगली आहे. परंतु सध्या मुग्धानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात मुग्धा आणि प्रथमेश म्हणतायत की...

'अजून काही ठरलं नाही', मुग्धा-प्रथमेश अखेर खरं बोलले...

Mugha Vaishapayan and Prathmesh Laghate: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी 'आमचं ठरलंय' अशी घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये फार जोरात चर्चा रंगली सुरू झाली आहे. नुकताच प्रथमेशच्या केळवणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे त्याचे हे केळवण घेण्यात आले. त्याचे हे पहिले केळवण होते. प्रथमेशनं आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊटवरून त्याच्या या पहिल्या वहिल्या केळवणाचा व्हिडीओ त्यानं पोस्ट केला होता. ज्यात त्यानं एक उखाणाही घेतला होता. यावेळी त्यानं उखाणा घेतला की, 'वाढलेलं पान रिकामी केलं एक एक घास घेत घेत, चतुरंगच्या कार्यालयामध्ये माझ्या जेवणाचा फक्कड जमला बेत'. यावेळी त्यानं पांढरा कुर्ता आणि डोक्यावर काळी टोपी घातली होती. यावेळी त्याच्या केळवणाच्या वेळी त्याचे औक्षणही करण्यात आले. 

यावेळी त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओत त्यानं लिहिलंय की,'“आमचं ठरलंय” च्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय! हे फीलिंग खूप भारी आहे!  अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग” ने केला त्याबद्दल चतुरंग च्या पूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद!' असे त्यानं लिहिलं आहे. यापुढे मुग्धा पैंशपायनला मिस केल्याचेही त्यानं लिहिलं होते. या व्हिडीओखाली मुग्धानंही कमेंट केली आहे आणि त्यात ती म्हणाली आहे की, किती छान! आणि पुढे तिनं इमोजीच टाकल्या आहेत.

चांदीच्या ताटात यावेळी प्रथमेशला वरण-भात, पुरणपोळी, भाजी-पोळी, पापड, श्रीखंड असे त्याच्या आवडीचे पदार्थ ठेवले होते. आता त्यांच्या या घोषणेनंतर प्रथमेशच्या केळवणाचीही खूप चर्चा झाली परंतु सध्या मुग्धानं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं Questions - Answers 2 या तिच्या सेशनचा एक व्हिडीओ युट्युबवर पोस्ट केला आहे. मुग्धा ही कायमच आपले काही इंटरेस्टिंग व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तिनं आपल्या चाहत्यांकडून आलेल्या प्रश्नोत्तराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. 

हेही वाचा - 'राजा मला नऊवारी साडी पाहिजे'वर थिरकलं जपानी जोडपं, Video पाहाच

त्यांचे नक्की कसे जुळले त्यानंतर मुग्धा इतक्या लहान वयातच लग्न करते आहे अशा नाना प्रश्नांची उत्तर प्रथमेश आणि मुग्धानं मिळून दिली. यावेळी त्यांना सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे या दोघांचे लग्न कधी आहे? यावर ते दोघं म्हणाले की, ''आम्ही आयुष्यात सेटल झालो आहोत आणि या स्टेजला येऊन लग्न करण्यात काहीच हरकत नाही आहे असं आम्हाला वाटतं तसंच मुग्धा 23 वर्षांची आहे आणि आमच्यात 4 ते 5 वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे आम्ही कबूली दिली म्हणजे लगेचच महिन्याभरात लग्न करत आहोत असं नाही. अजून काही ठरलं नाहीये.''

त्यावर मुग्धा म्हणाली की, ''लग्न कधी करणार हे अजून ठरलं नाही. त्यामुळे माझं लग्न 23 व्या वर्षीच होणार की 24 वर्षी हे माहिती नाही. त्यासाठी वाट बघा''. त्यांच्या या व्हिडीओवर तूफान लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. आत्तापर्यंत हा व्हिडीओ 75 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

Read More