Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तो प्रत्येक महिलेसोबत झोपतो...'; अमृता रावची बहीण प्रीतिकानं हर्षद अरोरावर केले गंभीर आरोप

Preetika Rao : अमृता रावची बहीण प्रीतिका रावनं एका नेटकऱ्याशी बोलताना हा धक्कादायक खुलासा केला आहे.

'तो प्रत्येक महिलेसोबत झोपतो...'; अमृता रावची बहीण प्रीतिकानं हर्षद अरोरावर केले गंभीर आरोप

Preetika Rao : बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण प्रीतिका रावनं तिच्या आणि हर्षद अरोराचा शो 'बेइंतेहा'मध्ये असलेल्या रोमॅन्टिक सीन शेअर करण्यावरून एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहेत. नेटकऱ्याला  उत्तर देत तिनं हर्षदवर महिलांना चुकीची वागणूक दिल्याचे देखील आरोप केले. नेटकऱ्यासोबत तिनं केलेल्या या चॅटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे स्क्रीनशॉट गुरुवारी रेडिटवर शेअर करण्यात आले आहेत. मेसेजमध्ये प्रीतिका त्या नेटकऱ्याला व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी आणि हर्षदविषयी गंभीर दावे करण्यावरून बोलताना दिसत आहे. 

प्रीतिका रावनं कथितपणे नेटकऱ्याला म्हटलं की 'तुला लाज वाटायला हवी. या व्हिडीओला आपल्या पेजवर टाकलेस. जो इंडस्ट्रीमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक स्त्रीसोबत झोपतो. अशा पुरुषासोबत माझे व्हिडीओ पोस्ट करू नका, असं मी तुला अनेकदा सांगितलं आहे. यापुढे याची काळजी घे. तू माझ्या आत्म्याच्या इच्छे विरोधात काही करत आहेस. कर्म तुझं आहे. त्याला तुलाच सामोरं जावं लागणार आहे.'

पुढे तिनं हे देखील सांगितलं की 'जवळपास 95% हे नो-टच सीन होते. प्रीतिकानं लहिलं की बेइंतेहामध्ये 95% हे नो टच सीन होते आणि आमच्याजवळ 5 टक्के सीन होते आणि तुम्ही माझ्या इच्छे विरोधात हे सगळं करत आहात. तुम्हाला लाज वाटायला हवी. माझे शब्द कायम लक्षात ठेवा तुम्ही तुमच्यावर वाईट कर्म घेऊन येत आहात.' 

हेही वाचा : युझवेंद्रसोबतचा 16 वर्ष जुना फोटो शेअर करत प्रीति झिंटा म्हणाली, 'त्यानं माझ्या टीममध्ये...'

दरम्यान, या विषयी सांगायचं झालं तर 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमॅन्टिक ड्रामा 'बेइंतहा' मध्ये दोन दूरच्या चुलत भावंडांची कथा होती जे एकमेकांचे वैरी असतात. पण एका चुकीमुळे त्यांना एकमेकांशी लग्न करावं लागतं. वेळेनुसार, त्यांच्या नात्यात असलेलं हे वैरीच्या नात्यात हळू-हळू प्रेमाचे कमळ उमलू लागतात. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या शोमध्ये शिवांगी जोशी, सुचित्रा पिल्लई आणि नावेद असलमसारखे कलाकार होते आणि त्यात लवकरच लोकप्रियता मिळवली. या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत प्रीतिका राव आणि हर्षदा अरोरा यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. 'बेइंतहा' ला मिळालेल्या यशानंतर प्रीतिका ही 'लव का है इंतजार' आणि 'लाला इश्क' सारख्या मालिकांमध्ये दिसली. या सगळ्यात हर्षदनं 'गुम है किसी के प्यार में', 'ससुराल सिमर का', 'दहलीज' आणि 'देवों के देव...महादेव' या मालिकांमध्ये दिसला. 

Read More