Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia Bhatt Pregnancy: आलियाचा स्टायलिश लूक, बेबी बंपचे फोटो व्हायरल

आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Alia Bhatt Pregnancy: आलियाचा स्टायलिश लूक, बेबी बंपचे फोटो व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या आलियाचा प्रेगेंसी लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच आलियाचे बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (Pregnant Alia Bhatt Flaunts Baby Bump) 

आणखी वाचा : चित्रपट फ्लॉप होण्यावर तब्बूची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाली 'आपले पैसे तर....'

आलिया नुकतीच 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत (Ayan Mukherji) सोबत दिसली. आलियानं यावेळी टी-शर्ट ड्रेस परिधान केला आहे. त्याचे काही फोटो आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तर काही तिच्या फॅन क्लबवरून शेअर करण्यात आले आहेत. 

आणखी वाचा : प्राजक्ता माळीचं चॅलेंज, सई ताम्हणकरची बोबडी वळली; पाहा Viral Video

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : ज्या कार्यक्रमातून अनेक कोट्यधीश होतात, त्याच 'कौन बनेगा करोडपती' साठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात माहितीये का? आकडा जाणून उडून जाल

आलियाने या फोटोमध्ये परिधान केलेल्या या ड्रेसवर एका पुरुषाचा चेहरा आहे आणि त्यावर बरेच काही लिहिले आहे. आलियानं तिचा बेबी बंप लपवण्यासाठी सैल असा हा ड्रेस परिधान केला आहे. आलियाचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

या प्रमोशनसाठी आलिया आणि रणबीर दोघेही धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये होते. या दोघांशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘ब्रह्मास्त्र भाग एक: शिव’ ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read More