Marathi News> मनोरंजन
Advertisement

'PM स्तुती करता मग तुम्ही भक्त आहात'; कोणत्या गोष्टीवरून चिडली प्रीति झिंटा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Preity Zinta : प्रीति झिंटानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा संताप व्यक्त केला आहे. 

'PM स्तुती करता मग तुम्ही भक्त आहात'; कोणत्या गोष्टीवरून चिडली प्रीति झिंटा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा ही सध्या अभिनयापासून लांब असली तर नेहमीच चर्चेत असते. प्रीति ही कोणत्या ना कोणत्या विषयावर तिचं मत मांडताना दिसते. या सगळ्यात तिनं सोशल मीडियावर आता एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून प्रीति झिंटानं सोशल मीडियावर वाढत असलेली ट्रोलिंग आणि टॉक्सिक मेन्टेलिटीवर प्रश्न उपस्थित केला आहे. प्रीतिनं सोशल मीडियावर तिचा विचार मांडला आहे. यावेळी दुसऱ्यांच्या विचारांचा विचार करा ते शिका आणि ऑनलाइन गरज नसलेल्या गोष्टींवर चर्चा करुन नका. जे चांगलं होतंय त्याला पाठिंबा द्यायला हवं असं बोलताना दिसली. 

प्रीति झिंटानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिलं की सोशल मीडियावर लोकांना काय झालंय? प्रत्येक व्यक्ती संशय का घेते? जर कोणी AI बॉटसोबत त्यांच्या पहिल्या चॅटविषयी बोलत आहे तर लोकांना वाटतं की हे एक पेड प्रमोशन आहे. जर तुम्ही तुमच्या पंतप्रधानांची स्तुती करता तर तुम्ही 'भक्त' आहात आणि जर तुम्हाला हिंद असल्याचा गर्व आहे किंवा भारतीय असल्याचा तर तुम्ही 'अंधभक्त' आहात. 

प्रीति पुढे म्हणाली, महत्त्वाचं म्हणजे आता वास्तव्य म्हणजे खरं काय आहे ते सगळ्यांसमोर मांडूया आणि लोकांना ते जसे आहेत तसं स्वीकारूया. आपण काय विचार करतो यावरून ती अशा प्रकारची व्यक्ती असेल असं ठरवू नका. जसे आहेत तसं त्यांना स्वीकारा. आपण जसे आहोत तशीच ती व्यक्ती असेलं असं आपण का समजावं. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. 

प्रीति झिंटानं नेटकऱ्यांना शांत रहण्यासाठी आणि सोशल मीडियावर आणखी सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींवर चर्चा करण्यास सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. तिनं सांगितलं की सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म असायला हवा जिथे देवाण-घेवाण हे आदरानं केलं पाहिजे. ना की कोणाला ट्रोल करण्यासाठी किंवा वाईट गोष्टी पसरवण्यासाठी.

हेही वाचा : पूनम पांडेला चाहत्यानं केला Kiss करण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीलाच केलं ट्रोल

ट्रोलर्सला उत्तर देत प्रीतिनं तिचं लग्न, ज्यावर लोकं नेहमीच प्रश्न उपस्थित करतात त्यांना देखील तिनं सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की 'आता मला हे विचारू नका की मी जीनशी लग्न का केलं. मी त्याच्याशी लग्न केलं कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. कारण सीमेवर एक अशी व्यक्ती आहे जी माझ्यासाठी जीव देऊ शकते. जर तुम्हाला माहितीये तर तुम्हाला माहितीये.' 

Read More