Marathi News> मनोरंजन
Advertisement

या बॉलिवूड अभिनेत्रीने जेलमध्ये घेतली सलमानची भेट...

काळवीट शिकारी प्रकरणी काल सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या बॉलिवूड अभिनेत्रीने जेलमध्ये घेतली सलमानची भेट...

मुंबई : काळवीट शिकारी प्रकरणी काल सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच त्याची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कालची रात्र तुरूंगात काढल्यानंतर आजची रात्रही सलमानला तिथेच काढावी लागणार आहे. बॉलिवूडच्या दबंग खानला शिक्षा झाल्यानंतर बॉलिवूडकरांनी त्यावर दुःख व्यक्त केले. इतकंच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सलमानला भेटायला चक्क जोधपूर जेलमध्ये पोहचली. सलमानच्या दोन्ही बहिणी भावाला आधार देण्यासाठी जोधपूरमध्येच आहेत. 

सलमान आणि प्रितीची मैत्री फार घट्ट

सलमान आणि प्रितीची मैत्री फार घट्ट आहे. त्याची प्रचिती या भेटीतून येते. सलमानला भेटायला जाणारी प्रिती पहिली बॉलिवूड सेलिब्रेटी आहे.सलमान आणि प्रितीने हर दिल जो प्यार करेगा, चोरी चोरी चुपके चुपके, जानेमन, हिरोज अशा अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे. 

fallbacks

अनेक सेलिब्रेटींनी घेतली सलमानच्या कुटुंबियांची भेट

सलमानला शिक्षा सुनावताच त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी सलमानच्या निवास स्थानी हजेरी लावली. त्यात कॉग्रेस नेते बाबा सिद्दीकी होते. तर अरबाजची एक्स वाईफ मलायका आणि तिची बहिण अमृता अरोरा, रेस ३ चे निर्माते रमेश तौरानी, अभिनेत्री स्नेहा उलाल, डेझी शहा यांनीही सलमाच्या कुटुंबियांची भेट घेतली. तर सोनाक्षी सिन्हा आपल्या आई-वडीलांसह म्हणजे शत्रुघ्न आणि पुनम सिन्हासोबत सलमानच्या घरी पोहचली.

fallbacks

Read More