Marathi News> मनोरंजन
Advertisement

नवरा नास्तिक असताना प्रिती झिंटा मुलांना कोणता धर्म शिकवणार? स्वत: केला खुलासा

Preity Zinta's Children Will Follow This Religion : प्रीति झिंटानं नुकताच चाहत्यांसोबत संपर्क साधला त्यावेळी तिनं मुलांना कोणत्या धर्माविषयी सांगणार याचा खुलासा केला आहे. 

नवरा नास्तिक असताना प्रिती झिंटा मुलांना कोणता धर्म शिकवणार? स्वत: केला खुलासा

Preity Zinta's Children Will Follow This Religion : बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा ही तिच्या नवऱ्या आणि मुलांसोबत अमेरिकेत राहत असली तरी सुद्धा ती तिच्या मुलांना हिंदू संस्कृती काय आहे, त्याविषयी सांगते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रीति झिंटानं आस्क मी एनीथिंगचं सेशन ठेवत चाहत्यांसोबत संपर्क साधला. यावेळी चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नांवर सांस्कृतील ओळख आणि परंपर या सगळ्यांना पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. या सगळ्यात ती तिच्या मुलांचा सांभाळ कशी करते याविषयी तिनं सांगितलं. 

प्रीति झिंटानं यावेळी खुलासा केला की तिनं आणि तिचा नवरा गुडइनफनं आपल्या मुलांना हिंदू म्हणून मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटलं की हे तिच्या इच्छेनं करत आहेत कारण तिची इच्छा आहे ही तिची मुलं ही परदेशात मोठी झाली तरी सुद्दा भारतीय संस्कृती त्यांनी विसरायला नको. एका चाहत्यानं उत्तर दिलं की प्रीति झिंटानं लिहिलं की 'आई झाल्यानंतर आणि परदेशात राहिल्यानंतर माझी ही इच्छा आहे की माझ्या मुलांनी हे विसरायला नको की ते अर्धे भारतीय आहेत. माझा नवरा हा नास्तिक आहे. त्यामुळे मला माझ्या मुलांना हिंदू संस्कृतीनुसार मोठं करायचं आहे.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

दरम्यान, यासोबत आपला आनंद व्यक्त करत प्रीतिनं हे देखील सांगितलं की हा निर्णय किती पर्सनल आणि मनानं घेतलेला आहे. जो ही संस्कृती आणि त्यासोबत प्रेम आणि गर्वाशी जोडलेला आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांना भारतीय परंपरा आणि मूल्ये सांगणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. ज्या देशाला ती घर म्हणतं आणि तिच्या मुलांना सांगते आणि त्या देशापासून ती लांब राहत असली तरी सुद्धा त्यांना त्याविषयी कळायला हवं. 

या जोडप्यानं 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आपल्या जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांच्या जुळ्या मुलांचं नाव जय आणि जिया असं आहे. प्रीति आणि जीन या दोघांनी 29 फेब्रुवारी 2016 मध्ये लॉस एन्जेलिसमध्ये लग्न केलं. तेव्हा पासून प्रीति ही अमेरिकेत राहते. ती भारतात तिच्या कामासोबत परदेशात तिच्या खासगी आयुष्याला देखील व्यवस्थित हाताळताना दिसते. ती अमेरिकेत राहत असली तरी सुद्धा प्रीति ही भारतात सतत येताना दिते. महत्त्वाचं म्हणजे आयपीएल सीजन दरम्यान. तर प्रीति ही पंजाब किंग्स टीमची सहमालक आहे. ती अनेकदा स्टेडियममध्ये तिच्या टीमचं प्रोत्साहन देताना दिसते. 

Read More