Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' सिनेमातून प्रिती झिंटा करणार कमबॅक

बॉलिवूडमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री प्रिती झिंटा खूप काळ रुपेरी पडद्यापासून दूर होती. 

'या' सिनेमातून प्रिती झिंटा करणार कमबॅक

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री प्रिती झिंटा खूप काळ रुपेरी पडद्यापासून दूर होती. पण आता पुन्हा एकदा प्रिती बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. भैयाजी सुपरहिट या सिनेमातून प्रिती दीर्घ काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

fallbacks

या सिनेमाचे पोस्टर अलिकडेच प्रदर्शित झाले. खुद्द प्रितीने ते आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. तिने हे पोस्टर शेअर करताना लिहिले की, ''पुनरागमन एका धमाक्यासोबत, भेटा सपना दुबेला भैयाजी सुपरहिट मध्ये १९ ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. पीजी इज बॅक.''

fallbacks

या सिनेमात प्रितीसोबत सनी देओल, अमीषा पटेल आणि अरशद वारसी हे कलाकार देखील आहेत. यात प्रिती भैयाजी म्हणजेच सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तिचे नाव आहे सपना दुबे.

fallbacks

पोस्टरमध्ये प्रिती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. हातात बंदूक आहे. प्रितीच्या पात्राची ओळख करुन देताना पोस्टरवर लिहिले वाक्य लक्षवेधी आहे. त्यात लिहिले आहे की, भैयाजी की धरम पत्नी आणि गरम पत्नी. बात कम और गोली ज्यादा चलाती हैं.

fallbacks

अॅक्शन आणि कॉमेडीचा पॉवरपॅक असलेला हा सिनेमा नीरज पाठक यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

Read More