Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO या व्हिडीओसाठी 'प्रिया प्रकाश'ने असा मेकअप केला होता

अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर लवकरच मल्याळम चित्रपट उरू अदार लवच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

 VIDEO या व्हिडीओसाठी 'प्रिया प्रकाश'ने असा मेकअप केला होता

मुंबई : अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर लवकरच मल्याळम चित्रपट उरू अदार लवच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. प्रियाचा पहिला चित्रपट या वर्षी ईदला येणार आहे. मात्र हा सिनेमा रिलीज होण्याआधीच प्रिया लोकप्रिय झाली आहे. प्रिया प्रकाशच्या व्हिडीओचे लोक एवढे चाहते आहेत की, नवीन व्हिडीओ इंटरनेटवर आला की तो लगेच व्हायरल होतो. यात आता नवीन व्हिडीओ आला आहे, आणि तो यासाठी महत्वाचा आहे, कारण प्रिया प्रकाशचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात तिने जो मेकअप केला आहे, त्याचा हा व्हिडीओ आहे. त्यामुळे हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आताच अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहण्यासाठी चाहत्यांच्या उड्या पडतायत.

आता हा जुनापण नव्याने प्रसिद्धीस आला व्हिडीओ

प्रिया प्रकाश इंटरनेटवर आपल्या पहिल्या व्हिडीओने ज्या पद्धतीने लोकप्रिय झाली, ज्या प्रकारे हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता, ज्यात तिने दाखवलेले डोळ्यांचे इशारे अनेकांना भावले, त्यासाठी तिचा तसा खास मेकअप कऱण्यात आला होता. शुक्रवारी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओला एक लाखपेक्षा जास्त वेळेस पाहण्यात आलं आहे.

इंस्टाग्रामवर 50 लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रियाने आपल्या व्हिडिओ इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींनी मागे टाकलं आहे. प्रिया प्रकाशचे अनेक व्हिडियो वायरल झाल्यानंतर इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यानंतर प्रिया प्रकाशने आपल्या इन्स्ट्राग्रामवर अनेक बड्या ब्रॅण्डची जाहिरात केली आहे.

Read More