Marathi News> मनोरंजन
Advertisement

मी सुंदर आहे! प्रिया प्रकाशच्या विधानाला आलिया भट्ने दिले उत्तर

इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या प्रियाला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सची संख्या ५.२ मिलियन्सच्या (५२ लाख) घरात आहेत.

मी सुंदर आहे! प्रिया प्रकाशच्या विधानाला आलिया भट्ने दिले उत्तर

मुंबई : मल्याळम फिल्म 'उरू आदर लव्ह'चे गाणे 'मानिक्य मलाराया पूवी'मध्ये आपल्या खास शैलीत डोळ्यांची अदाकारी दाखवणारी उदयोन्मुख अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियार प्रसिद्धीच्या झोतात आली. सोशल मीडियावरही ती जोरदार ट्रेण्ड झाली. तिच्या प्रसिद्धीची जादू आजही कायम आहे. मात्र, सध्या ती एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ज्या वक्तव्यावर अभिनेत्री आलिया भट्टनेही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मी सर्वात सुंदर असे विधान प्रियाने केले आहे. यावर प्रतिक्रीया देताना 'मी काही बोलू का?', अशी प्रतिक्रिया अलीया भट्टने दिली आहे. 

प्रिया विरूद्ध आलिया मीम व्हायरल

१८ वर्षांची प्रिया वारियार केरळ येथील त्रिशूर येथील राहणारी आहे. सध्या ती त्रिशूरच्या विमला कॉलेजमद्ये बी.कॉमचे शिक्षण घेत आहे. 'Oru Adaar Love'चित्रपटातील 'Manikya Malaraya'गाण्याच्या एका व्हायरल झालेल्या एका व्हडिओ क्लिपच्या माध्यमातून रातोरात ती ग्लोबल स्टार बनली. दरम्यान, इंटरनेटवर सध्या एक मीम जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात प्रिया प्रकाश आणि आलिया भट्ट दिसतात. प्रियाच्या फोटोवर लिहिले आहे. Now I am the Most beautiful girl. तर, या वक्तव्याच्या प्रतिक्रियेदाखल आलिया भट्टच्या फोटोवर लिहिले आहे की, मैं कुछ बोलू? हे मीम इन्स्टाग्रामवर असून, आलिया भट्टच्या एका चाहत्या ग्रुपने शेअर केले आहे. सोबतच हे मीम मजा म्हणून घ्या. गांभीर्याने घेऊ नका असेही म्हटले आहे.

आलिया, तैमुरचेही मीम व्हायरल

इतकेच नव्हे तर, याच ग्रुपच्या माध्यमातून आलिया आणि तैमूर यांचेही एक मीम शेअर केले आहे. ज्यात अलिया तैमुरला आपले आऊटफिट्स दाखवत विचारते की, तैमुरला पहा तो किती सुंदर आहे ना? उत्तरादाखल तैमुर म्हणतो, '- हाय मैं तो मर ही जावां' केवळ मजेसाठी केलेले असे अनेक मीम नेहमीच व्हायरल होत असतात.

 

Edit Idea @prachidesaifanclub2  #TaimurSpeaks  mai to mar hi jaawa Alia  #aliabhatt

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt.x) on

इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या प्रियाला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सची संख्या ५.२ मिलियन्सच्या (५२ लाख) घरात आहेत. 

Read More