Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा!

व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर देशभरात हिट झाली आहे. 

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा!

नवी दिल्ली : व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर देशभरात हिट झाली आहे. तिच्या बॉलिवूड पर्दापणाची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र तिच्या बॉलिवूड पर्दापणाबद्दल काही खात्रीशील माहिती हाती आलेली नाही. पण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासोबत प्रिया झळकेल, अशी चर्चा आहे. रातोरात स्टार झालेली प्रिया प्रकाशला बॉलिवूडमधून अनेक ऑफर्स येत आहेत. मात्र बॉलिवूडच्या टॉप स्टार्ससोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले.

या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा

डीएनएला दिलेल्या मुलाखतीनुसार, शाहरुख खान, रणवीर सिंग आणि सिद्धार्थ मल्‍होत्रा हे तिचे बॉलिवूडमधील आवडते अभिनेते आहेत. तसंच अभिनेत्रींमध्ये तिला दीपिका पदुकोण सर्वात जास्त भावते. या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास मला अत्यंत आनंद होईल, असेही प्रियाने सांगितले.

fallbacks

शिक्षण आणि सिनेमा

प्रियाने सांगितले की, शिक्षण पूर्ण करणं हे तिचं प्रथम प्राधान्य आहे. त्याचबरोबर ती सिनेमातही काम करेल. 

fallbacks

 

Read More