Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रिया प्रकाशने केरळ पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

इंटरनेट सेंसेशन झालेली प्रिया प्रकाश वॉरियर चर्चेत असणे काही नवीन राहिलेले नाही. 

प्रिया प्रकाशने केरळ पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

मुंबई : इंटरनेट सेंसेशन झालेली प्रिया प्रकाश वॉरियर चर्चेत असणे काही नवीन राहिलेले नाही. प्रियाचे फोटोज, व्हिडिओज पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अलिकडेच प्रियाचा एक फोटो समोर आला. त्यात प्रिया ओमनसाठी तयार झाली आहे. त्यासाठी तिने गोल्डन रंगाची साडी नेसली असून त्यावरील लाल रंगाचा ब्लाऊच अत्यंत खुलून दिसत आहे. 

 

 

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

 

Some things never change 

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

त्याचबरोबर केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत प्रियाने मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्तांसाठी तिने १ लाखाची मदत केली. प्रिया प्रकाश सोशल मीडियावर प्रॉडक्ट प्रमोशनसाठी ८ लाख रुपये चार्ज करते. इतकंच नाही तर एका जाहिरातीसाठी प्रिया १ कोटी चार्ज करते. प्रियाची लोकप्रियता पाहता तिला बॉलिवूडमधूनही सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या. 

लवकरच प्रियाचा पहिला सिनेमा 'ओरु अदार लव' प्रदर्शित होईल. सोशल मीडियावर प्रियाचे ५० लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळेच तिने कोणताही फोटो, व्हिडिओ शेअर केल्यानंतर ते व्हायरल झाले नाहीत, तरच नवल. 

Read More