मुंबई : आपल्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारियर सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र सध्या ही चर्चा वेगळ्याच कारणाने रंगत आहे. प्रिया आणि तिचा ऑनस्क्रिन प्रियकर अब्दुल रहूफ यांनी चक्क सचिन तेंडूलकरची भेट घेतली आहे.
मल्याळम सिनेमा ओरु अदार लव ची अभिनेत्री प्रिया प्रकाशने फुटबॉल ग्राऊंडमधून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. तो शेअर करताना तिने लिहिले की, क्रिकेटच्या देवाला भेटले. मी आणि रोशन...
With the “ God of cricket , ' @sachin_rt' “
— Priya Prakash Varrier (@PriyaPVarier) February 23, 2018
“Fan girl moment “
Me and Roshan- “Contento Chicas” pic.twitter.com/u2u9RRz1v1
हा फोटोसोबतच प्रिया आणि रोशनचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. जो इंडियन सुपर लीग च्या ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत ती आपल्या टीमला चिअर करताना दिसत आहे. यात तिच्यासोबत रोशन आणि तिचा लहान भाऊ देखील आहे.
Priya Prakash Varrier and Roshan Abdul Rahoof are in attendance for #KERCHE!#LetsFootball #HeroISL pic.twitter.com/4sggWKUtd1
— Indian Super League (@IndSuperLeague) February 23, 2018
प्रिया प्रकाश मल्याळम सिनेमा ओरु अदार लव यातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमा ३ मार्च २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन उमर लुलु यांनी केले असून शान रहमान यांनी सिनेमाल संगीत दिले आहे. प्रिया बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. अलिकडेच तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितेल की, तिला रणवीर सिंग आणि शाहरुख खान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे.