Marathi News> मनोरंजन
Advertisement

'याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर...' प्रियदर्शिनीने शेअर केला ओंकारचा प्रायव्हेट व्हिडीओ

शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने ओंकारचा एक खाजगी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत हे कलाकार महाराष्ट्राची हास्यजत्रा  या शोमधून घरांघरात पोहचले. 

'याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर...' प्रियदर्शिनीने शेअर केला ओंकारचा प्रायव्हेट व्हिडीओ

मुंबई : प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत हे कलाकार महाराष्ट्राची हास्यजत्रा  या शोमधून घरांघरात पोहचले. या आधीही ही कलाकार जोडी अनेकदा चर्चेत आली आहे. याआधी या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि यामागचं कारण जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. नुकताच ओंकारने नुकताच स्वत:चा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमीत्तानेच प्रियदर्शनीने ओंकारसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने ओंकारचा एक खाजगी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला बिग बॉसचा टाईम अलार्म वाजताना दिसत आहे. याचबरोबर ओकांर या व्हिडिओत सारखाच झोपताना दिसत आहे. कधी बेडवर तर कधी सोफ्यावर तर कधी तो गाडीतच विश्रांती घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रियदर्शनीने कॅप्शनमध्ये 'जागतिक आळसदिनाच्या शुभेच्छा ! Happy birthday @onkar_raut, PS - Please don’t kill me. असं कॅप्शन दिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेअर केलेल्या प्रियदर्शनीच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, असा पण दिवस असतो? तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, अरे बापरे किती झोपतो हा माणूस. तर अजून एकजण म्हणतं, अरे मग काम कधी ... कोण माणूस ठेवलाय का तर अजून एकाने म्हटलंय, आळशी बिग बॉस. तर अजून एकजण म्हणतोय, झोपून उठला की आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आठवणीने कळव ग बाई आणि ते पण परत झोपण्याच्या आत. तर अजून एकाने म्हटलंय, झोपायचं तर झोप म्हणा पण निदान नीट झोप, मणक्याची पार वाट लाऊन ठेवेल स्वतःच. अशा अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. 

fallbacks

तर अनेकांनी या पोस्टवरुन या दोघांना ट्रोलही केलं आहे. याआधी वनिता खराच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हा फोटो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्रावर शेअर केला होता. या फोटोत ती ओंकार राऊतला पकडून उभी असल्याचं दिसत होती. तक ओंकार तिच्याकडे बघत आहे. तर ती कॅमेराकडे बघून स्माईल देत आहे. तिच्या या फोटोवरुन त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. मात्र या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे हे देखील या दोघांनी नंतर स्पष्ट केलं होतं.

Read More