Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : प्रियांका-परिणीती म्हणतायत 'टिप टिप बरसा पानी...'

परिणीतीनं आपल्या गोवा टूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय

व्हिडिओ : प्रियांका-परिणीती म्हणतायत 'टिप टिप बरसा पानी...'

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल सध्या तिचा परदेसी बॉयफ्रेंड निक जोनाससोबत गोव्यात मजा-मस्ती करतेय. यावेळी तिच्यासोबत तिची चुलत बहिण परिणीती चोपडाही आहे. परिणीतीनं आपल्या गोवा टूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये दोन्ही बहिणी अक्षय कुमारच्या एका सिनेमातलं गाणं गुणगुणताना आणि त्यावर नाचताना दिसत आहेत...

जवळपास ९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये प्रियांका आणि परिणीती अक्षय कुमारच्या 'मोहरा' या सिनेमातलं गाणं 'टिप टिप बरसा पानी' रिक्रिएट करताना दिसतायत. या व्हिडिओतून दोघीजणी मान्सून चांगलाच एन्जॉय करताना दिसतायत. 

Not a cheesy Chopra sister performance. Nope. @priyankachopra #DancingInTheRain

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

यापूर्वी निक जोनासनंही प्रियांकाचा एक व्हिडिओ शेअर केला होता... त्यातही प्रियांका भिजताना दिसत होती. 

उल्लेखनीय म्हणजे, प्रियांका चोपडा आणि निक जोनास यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. निक जोनास काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झालाय. प्रियांका निकला डिनरसाठी वांद्रेमधील एका रेस्टॉरन्टमध्येही घेऊन गेली होती. यावेळी तिची आई मधु चोपडादेखील सोबत होत्या. यामुळे प्रियांका आणि निकचं नातं पुढच्या टप्प्यात कधी सरकणार? याच्याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय. 

अमेरिकन सिंगर असलेला निक प्रियांकाहून १० वर्षांनी लहान आहे. निक २५ वर्षांचा आहे तर प्रियांका ३५... दोघांची भेट टीव्ही कार्यक्रम 'क्वांटिको'च्या शूट दरम्यान झाली होती. 

Read More