Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियांका चोप्राने सेरोगेसीव्दारे जन्म दिलेली मुलगी अखेर मातृदिनी आली घरी; पाहा पहिली झलक

मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे.हा फोटो शेअर करताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

प्रियांका चोप्राने सेरोगेसीव्दारे जन्म दिलेली मुलगी अखेर मातृदिनी आली घरी; पाहा पहिली झलक

मुंबईः मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे.  फोटोमध्ये, प्रियांकाने तिच्या बाळाला आपल्या हातात धरले आहे आणि निक जोनास मुलीकडे प्रेमाने पाहत आहे. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

प्रियांकानं लिहिलंय की, मदर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून कठीण परिस्थितीतून जात होतो, अनेक लोकांनी याचा अनुभव घेतला असेल. NICU मध्ये 100 हून अधिक दिवसांनंतर, आमची मुलगी शेवटी घरी आली आहे.

प्रियांका पुढे लिहिते,  आपण मागे वळून पाहिले तर आपल्याला प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे याची जाणीव होते. आमची लहान मुलगी शेवटी घरी आली याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. आमचा पुढचा प्रवास आता सुरू होत आहे आणि आमचे बाळ खरोखरच मजबूत आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने बाळावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका या सर्वांचे आभार मानले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाला सरोगसीद्वारे जानेवारी महिन्यात मुलीचा जन्म झाला होता, मात्र  बाळ प्रीमॅच्युअर असल्याने बाळावर हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू होते. अखेर 100 दिवसानंतर प्रियांकाची मुलगी घरी परतली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या पोस्टमध्ये प्रियंका चोप्राने आपल्या मुलीला एमएम म्हटले आहे, ज्याचा अर्थ मालती मेरी असू शकतो. अलीकडेच अशी बातमी आली होती की प्रियांका आणि निकच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास आहे आणि स्वतः प्रियांकाने याला दुजोरा दिल्याचे दिसत आहे.

Read More