Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियांका चोप्राचा अपघात? फोटो पाहून चाहते चिंतेत

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी वेबसीरिज सिटाडेलचं शूटिंग करत आहे. 

 प्रियांका चोप्राचा अपघात? फोटो पाहून चाहते चिंतेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी वेबसीरिज सिटाडेलचं शूटिंग करत आहे. यादरम्यान, अभिनेत्री तिचे इंस्टाग्राम फोटो शेअर करून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने सेटवरील एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. आता या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर पुन्हा एक फोटो शेअर केला आहे. मात्र हा फोटो पाहून तुम्ही काही सेकंदांसाठी घाबरून जाल. पण पुढच्याच क्षणी तुम्हालाही फोटोमागचं सत्य कळेल.

खरंतर प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये प्रियांका खूपच थकलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर जखमा आणि रक्ताचे डाग दिसत आहेत. या अभिनेत्रीचा हा फोटो पाहिल्यावर पहिल्यांदा तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचं दिसत असलं तरी बारकाईने पाहिल्यानंतर अभिनेत्रीने चेहऱ्यावर मेकअप केल्याचं समजतय. फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं की, 'तुम्हाचाही कामाचा इतका कठीण दिवस होता का?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांकाने जगाला आपल्या मुलीची ओळख करून दिली 
निक आणि प्रियांकाच्या मुलगी प्री-मॅच्युअर आहे आणि या कारणास्तव तिला सुमारे 100 दिवस  Neo Natal Intensive Care Unit मध्ये ठेवण्यात आलं होतं. प्रियांकाने तिच्या मुलीला रुग्णालयातून घरी आणल्यानंतर पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. जरी तिचा चेहरा दिसत नव्हता. फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे की, 'या मदर्स डेच्या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे की, गेले काही महिने आमच्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखे होते.

Read More