Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : प्रियांकाकडून आपला 'परिचय' ऐकून निक चक्क लाजला

अर्थातच हा व्हिडिओ थोड्याच वेळात इंटरनेटवर व्हायरल झाला

व्हिडिओ : प्रियांकाकडून आपला 'परिचय' ऐकून निक चक्क लाजला

मुंबई : नुकतंच विवाहबंधनात अडकलेलं जोडपं प्रियांका चोपडा आणि निक जोनास यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांत तुफान लोकप्रिय झालेत. २ आणि ३ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणाऱ्या या जोडप्यानं बुधवारी मुंबईत एक रिसेप्शन दिलं होतं... या रिसेप्शनमध्ये असं काही घडलं की ज्याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल... कदाचित प्रियांकानंही नाही...

ही रिसेप्शन पार्टी प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी आयोजित केली होती. या पार्टीत प्रियांकानं सगळ्या पाहुण्यांना आपल्या पतीचा 'परिचय' करून दिला... हा परिचय ऐकून निक लाजून लालेलाल झालेला दिसला. निक असा काही लाजला की कोणत्याही कॅमेरा त्याची ही रिअॅक्शन लपवू शकणार नाही... आणि अर्थातच हा व्हिडिओ थोड्याच वेळात इंटरनेटवर व्हायरल झाला.

fallbacks
प्रियांका आणि निक

या व्हिडिओत प्रियांका आलेल्या पाहुण्याचे आभार मानताना दिसतेय. मित्रमंडळी आणि नातेवाईकांसमोर ती वडिलांची आठवण काढून किंचितशी भावूकही झाली... त्यानंतर तिनं रोमान्टिक अंदाजात पती निकचा परिचय करून दिला. यावेळी, लाजून लालेलाल झालेल्या निकनं माईक आपल्या हातात घेत 'हा आपला भारतातील पहिला शो असल्याचं' म्हटलं. यावर प्रियांकासहीत उपस्थितांच्या चेहऱ्यावरचं हसू खळखळून समोर आलं. 

View this post on Instagram

They are so cute #nickyankareception

A post shared by ℬollywood (@bollysfitoor) on

बुधवारी मुंबईत पार पडलेलं हे प्रियांका आणि निकच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन होतं. याअगोदर प्रियांकानं ४ डिसेंबर रोजी दिल्लीतही एक रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. यानंतरही २० डिसेंबर रोजी मुंबईत आणखीन एक रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय. मुंबईच्या हॉटेल ताज लँडसमध्ये होणाऱ्या या पार्टीत बॉलिवूडची अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत.  

Read More