मुंबई : प्रियंका चोप्राने गुपचूप केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. एक फोटो पाहुन युजर्सने या अंदाज वर्तवला होता. प्रियंका सध्या आसाममध्ये आहे आणि ती आसाम टूरिझमचे प्रमोशन करत आहे. याचदरम्यान तिच्या हातात एक ब्रेसलेट पाहण्यात आले आणि ते ब्रेसलेट नसून मंगलसूत्र असल्याचे युजर्सने मानले. आणि प्रियंकाच्या लग्नाचा चर्चा सुरु झाल्या. तिने गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र या अफवांना प्रियंकाने जबरदस्त उत्तर दिले. ट्वीट करत तिने या अफवांवरुन पडदा उठवला. ट्वीटमध्ये तिने म्हटले आहे की, मी अजून लग्न केलेले नाही आणि हे फक्त एक ब्रेसलेट आहे.
आजकाल मंगळसुत्र गळ्यात घालण्याऐवजी हातात घालतात. त्यामुळेच युजर्सने असा तर्क लावला. या ब्रेसलेटचा पूर्ण फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिले की, हाहाहाह... अफवांचा हा वेगळाच स्तर आहे... शांत रहा मित्रांनो हे एक ब्रेसलेट आहे... मी जेव्हा लग्न करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेन...
https://t.co/EkUEgfbO75
— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2018
Hahahah!heights of speculation! This is an evil eye guys! Calm down! I’ll tell u when I get married and it won’t be a secret! Lol pic.twitter.com/WPdIxXIx1I
लवकरच प्रियंका भारत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या सिनेमातून सलमान-प्रियंकाची जोडी १० वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहेत.