Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपूर कुटुंबातील लेकिचे कृत्य पाहून प्रियंकाही थांबत म्हणाली...

कपूर कुटुंबाच्या लेकीने कॅमेऱ्यासमोर अशा कृत्यावर फक्त युजर्स नाही, तर प्रियंका चोप्रा देखील व्यक्त  

कपूर कुटुंबातील लेकिचे कृत्य पाहून प्रियंकाही थांबत म्हणाली...

मुंबई : बॉलिवूडमधील कपूर कुटुंब कायम चर्चेत असते. कुटुंबातील कोणतीही गोष्टी क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होते. अता सध्या कपूर कुटुंबाची लेक अंशूला कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अंशूलाने अंतर्वस्त्र काढत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. रविवारच्या दिवशी बाहेरून घरी आल्यानंतरचा सर्वोत्तम क्षण म्हणजे...., असं कॅप्शन लिहित तिनं चक्क कॅमेरासमोरच इनर्स काढण्यास सुरुवात केली आहे. 

#NoBraClub असं लिहित तिनं अंतर्वस्त्रे काढली आणि तिच्या या व्हिडीओसह कॅप्शननंही नेटकऱ्यांचं मन जिंकलं. बऱ्याच तरुणींनी तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आपल्याही मनातील भावना व्यक्त केल्या. 

fallbacks

अंशूलाच्या व्हिडीओवर अभिनेत्री प्रियंका चोप्राने कमेंटमध्ये ‘हे रोजचं आहे,’ असं लिहिलं आहे. सध्या अंशूलाचा व्हिडीओ आणि प्रियंकाची कमेंट तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रत्येक वेळी नीटनेटकं दिसण्यासाठी म्हणून तरुणी म्हणा किंवा महिला म्हणा जे कपडे घालतात, त्यामध्ये शरीराला त्रासदायक असतानाही त्यांना Inners चं ओझं सोबत बाळगावं लागतं. कितीही नाकारलं तरी ही बाब नजरेआड करता येण्याजोगी नाही. 

अद्यापही न्यूनगंडाचा विषय असणाऱ्या या मुद्द्यावर अंशुलानं अनोख्या अंदाजात तिची भूमिका स्पष्ट करत पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल? 

Read More