Marathi News> मनोरंजन
Advertisement

वडिलांच्या निधनानंतर 6 दिवसांनी प्रियांकाने ठेवली होती पार्टी, आईने केला डान्स; नातेवाईक म्हणाले 'नवरा गेलाय अन् हे...

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या आगामी सिनेमा आणि पर्सनल लाइफबद्दल मोकळेपणाने चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी वडिलांच्या निधनाबद्दल केलेला खुलासा धक्कादायक आहे. 

वडिलांच्या निधनानंतर 6 दिवसांनी प्रियांकाने ठेवली होती पार्टी, आईने केला डान्स; नातेवाईक म्हणाले 'नवरा गेलाय अन् हे...

प्रियंका चोप्रा एसएस राजामौलीचा सिनेमा SSMB 29 मधून पुन्हा एकदा भारतीय सिनेमात दिसणार आहे. प्रियंका चोप्रा आणि मधु चोप्रा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. यामध्ये मधु आनी आपल्या पतीचं निधन आणि त्यानंतर प्रियंका चोप्राने सरप्राइज पार्टी प्लान केली होती. पतीच्या निधनानंतर अवघ्या 6 दिवसांत त्यांनी पार्टीमध्ये डान्स केला होता. 

तर झालं असं की, प्रियंकाच्या वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6 दिवसांनी आईसाठी एक सरप्राईज पार्टी प्लान केली होती. यामध्ये जॉन अब्राहम देखील होती. मधु चोप्रा यांनी सांगितलं की, प्रियंकाने त्यांच्या पतीच्या निधनाच्या 6 दिवसांनंतर बर्थ डे पार्टी ठेवण्याचा हट्ट केला होता. 

मधु यांनी सांगितलं की, पतीचे निधन 10 जून रोजी झाले होते. आणि मधु यांचा जन्मदिवस हा 16 जून रोजी असते. त्यावर्षी मधु यांचा साठावा वाढदिवस होता. त्यांच्यासाठी प्रियंकाने सरप्राईज बर्थ डे प्लानिंग केलं होतं. प्रियंकांच्या वडिलांच्या आजारपणामुळे संपूर्ण परिवार तेथे उपस्थित होता. सगळे वडिलांच्या निधनाच्या दुःखात होते. अशावेळी प्रियंकाने आई मधु यांच्या वाढदिवसाचं प्लानिंग केलं आणि पार्टी अरेंज केली. वडिलांना देखील हेच अपेक्षित असल्याचं सांगितलं. 

या मुलाखतीत मधुने सांगितलं की, त्या जॉन अब्राहिमच्या खूप मोठ्या फॅन आहेत. प्रियंकाने जॉनला मध्यरात्री येण्याची रिक्वेस्ट केली होती की, बर्थ डे गिफ्ट प्रमाणे पॅक होऊन येईल. आईचा वाढदिवस खास व्हावा म्हणून प्रियंकाने हे प्लानिक केलं. या वाढदिवसाला अनेक लोकं दुःखी चेहऱ्याने बसले होते. ते म्हणत होते की, बघा, ही कशी बाई आहे. पतीच्या निधनानंतर वाढदिवसाचा आनंद साजरा करत आहे. तिला पतीच्या निधनाचं दुःख नाही का? 

या दरम्यान मधु चोप्रा यांनी सांगितलं की, माझ्या मुलीने एवढं सगळं प्लानिंग केलंय तर मग मी दुःखी कशी राहू. मी त्यांच्या इच्छांचा आदर करते. आणि हेच महत्त्वाचं आहे की, मी त्यांच्यासोबत चालेन. 

मधुने जॉन अब्राहमची चाहती असल्याचे उघड केले आणि म्हणाली, "प्रियंकाने जॉनला मध्यरात्री येण्याची विनंती केली आणि तेही वाढदिवसाच्या भेटवस्तूसारखे भरलेले होते. कल्पना करा! प्रियंका म्हणाली, 'नाही, मम्मीचा हा क्षण खास असावा.'" डीजे आणि संगीतासह ती खूप मजेदार पार्टी होती. पण कुटुंबातील बाकीचे लोक तिथे उदासपणे बसले होते आणि म्हणत होते, 'तिला बघा! ती नाचत आहे! तिला तिच्या नवऱ्याबद्दल वाईट वाटत नाही का?' दरम्यान, मी विचार करत होतो, 'माझ्या मुलीने हे सर्व केले. माझ्या मुलांनी खूप प्रयत्न केले. ते सर्व दुःखी आणि दुःखी आहेत, पण ती अशा प्रकारे तिच्या वडिलांचा सन्मान करत आहे.' प्रियांकाने तर असेही म्हटले की, 'मी तिच्या इच्छेचा आदर करते आणि तू तिच्यासोबत गेलास तर बरे होईल'. ती अशा प्रकारची व्यक्ती आहे.

Read More