Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियंका चोप्रा या आजाराने ग्रस्त

अशा कोणत्या आजाराचा होतोय त्रास 

प्रियंका चोप्रा या आजाराने ग्रस्त

मुंबई : बॉलिवूडमध्ये एका बाजूला अनेक कलाकार कॅन्सरशी दोन हात करत असताना प्रियंका चोप्राला देखील एक आजार झाल्याचं समोर आलं आहे. या आजाराबाबत स्वतः देसी गर्ल प्रियंका चोप्राने माहिती दिली आहे. यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. 

प्रियंका चोप्राला अस्थमाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. प्रियंकाने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मला अस्थमाचा आजार असल्याचं सांगत. त्यात लपवण्यासारखं काही नसल्याचं तिने सांगितलं आहे. 

आपल्या ट्विटमध्ये प्रियांका चोप्रा म्हणते की, “ज्या व्यक्ती मला चांगल्या ओळखतात त्यांना माहितच असेल की मला अस्थमा आहे. आणि यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही. अस्थमाने मला कंट्रोल करण्यापूर्वी मलाच अस्थमाला कंट्रोल करावं लागलं. मला इन्हेलर सोबत ठेवावा लागतो. आणि माझ्याजवळ इन्हेलर असल्याने अस्थमा मला माझं ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही.”

Read More