Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका...नाव मात्र आलिया, कतरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय  

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका...नाव मात्र आलिया, कतरिनाचं

मुंबईः प्रियांका चोप्रा हॉलिवूडसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम करत आहे. दरम्यान, प्रियंका चोप्राने अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री कोण आहेत हे सांगितले. 

fallbacks

प्रियांका चोप्राने 'डेडलाईन'ला ही मुलाखत दिली. यादरम्यान प्रियंका चोप्राने आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबतच्या तिच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटाबद्दलही बोलली. यावेळी प्रियांका चोप्राने आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनाही बॉलिवूडच्या टॉप 2 अभिनेत्री म्हटले.

fallbacks

प्रियांकाने टॉप 2 अभिनेत्रींमध्ये कतरिना आणि आलियाचं नाव घेतलं असून दीपिकावर अप्रत्यक्षपणे निशाणा लगावला आहे.

प्रियांका चोप्रा म्हणाली- 'मी भारतातील टॉप 2 अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत एक चित्रपट करत आहे. यासोबतच आम्ही तिघींनीही चित्रपट करून त्याची निर्मिती करण्याचं ठरवलंय.

fallbacks

जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ते खूप कठीण वाटलं. बरं, चित्रपटांमध्ये आम्ही नेहमीच एकमेकांच्या विरोधात असतो. आमची कास्टिंग चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्यावर अवलंबून होती. त्यावेळी मागणी काय असेल यावरही अवलंबून आहे.

fallbacks

'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर केली होती. या चित्रपटाची कथा फरहान अख्तर, झोया अख्तर आणि रीमा यांनी लिहिली आहे. मात्र, या चित्रपटाची कथा काय आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अखेरची 'द स्काय इज पिंक' या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती

Read More